April 23, 2025 7:02 PM
9
राज्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्रसरकारची मंजुरी
खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्रसरकारनं मान्यता दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली एकूण १३ लाख २२ हजार टन तूर याअंतर्गत खरेदी केली जाणार ...