राष्ट्रीय

May 7, 2025 9:11 PM

views 34

भारताचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, ९ दहशतवादी तळ उद्धवस्त

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमधे दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त झाले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त  वार्ताहर परिषदेत...

May 7, 2025 9:11 PM

views 29

‘ऑपरेशन सिंदूर’ला जगाचा पाठिंबा

भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल साऱ्या जगानं भारताला पाठिंबा दिला आहे.    भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्राएलने म्हटलं आहे. भारतातले इस्राएलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलं आहे की निरपराधांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना तोंड लपवायला जागा नाही हे समजलं पाहिजे.   ...

May 7, 2025 9:13 PM

views 14

छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात करगुट्टा टेकडीवर आज सकाळी सीआरपीएफ, जिल्हा राखीव दल, स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी मोहीम अद्याप सुरू आहे.

May 7, 2025 6:37 PM

views 116

CBI चे संचालक प्रवीण सूद यांच्या कार्यकाळात वाढ

केंद्र सरकारनं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे. मंत्रिमंडळाच्या समितीनं या मुदतवाढीस मंजुरी दिली. सूद हे कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी असून ते या महिन्याच्या २५ तारखेला निवृत्त होणार होते.

May 7, 2025 9:22 PM

views 22

ऑपरेशन सिंदूरबद्दल जगाच्या प्रतिक्रिया

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल जगभरात विविध प्रतिक्रीया उमटल्या आहेत.    पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे, असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी म्हटलं असून या हल्ल्याला उत्तर देण्याचा अ...

May 7, 2025 4:01 PM

views 31

देशात आज ‘मॉक ड्रिल’ !

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी आज मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. अतिसंवेदनशील ठिकाणांमधे मुंबई, उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे. त्याखेरीज ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनम...

May 7, 2025 7:02 PM

views 22

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पूंछ, राजौरी, कुपवाडा, बारामुल्ला भागात पाकिस्तानच्या लष्करानं नियंत्रण रेषेच्या आसपास  जोरदार गोळीबार केला. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबीराला भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर दिलं. या गोळीबारात या भागातल्या अन...

May 7, 2025 9:23 PM

views 17

‘शक्ती’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

कोळसा वापर आणि वाटप करण्याच्या सुधारित ‘शक्ती’ योजनेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या अर्थ व्यवहार विषयक मंत्रीमंडळ समितीने मान्यता दिली आहे. केंद्र, राज्य आणि स्वतंत्र औष्णिक वीज केंद्रांना कोळसा पुरवठा करण्यासाठी या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. नव्या शक्ती धोरणामुळे औष्णिक व...

May 7, 2025 8:26 PM

views 36

केंद्रीय गृहमंत्र्यांची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. सीमावर्ती  भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी सीमा सुरक्षा दला...

May 7, 2025 6:58 PM

views 28

‘ऑपरेशन सिंदूर’ चं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक

भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' चं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे.   पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्घृण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जगानं दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स धोरण दाखवलं प...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.