राष्ट्रीय

May 8, 2025 3:04 PM

views 10

RBI ची नियामक चौकट जाहीर

रिझर्व्ह बँकेच्या प्रक्रियेच्या नियमनाचं प्रमाणीकरण करण्यासाठी एक नियामक चौकट जाहीर करण्यात आली आहे.  या नियामक चौकटीमधे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेले निर्देश, मार्गदर्शक तत्त्वं, सूचना,  आदेश, धोरणं यांचा समावेश असेल.   नव्या नियामक चौकटीनुसार  नियमांचा मसुदा निवेदनासह रिझर्व्ह बँकेच्या www.rbi....

May 8, 2025 2:47 PM

views 30

उत्तराखंडमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनानी इथे आज सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सात जण प्रवास करत होते.    डेहराडून इथल्या सहस्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हे हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथे निघा...

May 8, 2025 2:40 PM

views 16

जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद

जम्मू- काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यातल्या चंबा सेरी इथं पावसामुळं चिखलाचा ढिगारा झाल्यानं जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा ढिगारा काढून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू असून पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिक माहिती दिली जाईल  असं जम्मूतल्या आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आह...

May 8, 2025 2:33 PM

views 7

 अमृतसर फॅक्ट चेक

 अमृतसरमध्ये लष्करी तळावर हल्ला झाल्याच्या खोट्या बातम्या आणि व्हिडीओ पाकिस्तान प्रसारित करत आहे, परंतु हा व्हिडीओ २०२४ च्या वणव्यावेळचा असल्याचं पत्र आणि सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. त्याबरोबरच पाकिस्तानातल्या गुजरानवाला इथं पाकिस्तानी सैन्यानं भारतीय ड्रोन पाडल्याचा खोटा फोटो पाकिस्तानातल्या...

May 8, 2025 1:42 PM

views 22

डोवाल यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्यांशी संपर्क साधला  आणि पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

May 8, 2025 1:18 PM

views 29

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा प्रवक्ता जीयंद बलूच यानं दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.   या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानातली सततची संघर्षात्मक स्थिती पुन्हा एकदा उघड झाली आहे. इथले फुटीरतावादी गट द...

May 8, 2025 11:23 AM

views 7

प्रवीण सूद यांचा कार्यकाळात एक वर्षासाठी वाढ

सरकारने सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यास मान्यता दिली आहे. सूद हे या महिन्याच्या 25 तारखेला निवृत्त होणार होते.

May 8, 2025 10:51 AM

views 7

एस जयशंकर यांची ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध देशांतील समपदस्थाबरोबर कारवाईबाबत चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल स्पेन, जर्मनी, फ्रान्स, कतार आणि जपान या देशांच्या त्यांच्या समपदस्थाबरोबर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवाद्यांना आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलेल्य...

May 8, 2025 9:19 AM

views 28

ऑपरेशन सिंदूरमधे दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमधे दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत...

May 8, 2025 9:06 AM

views 26

ऑपरेशन सिंदूरला जगभरातून पाठिंबा

भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल संपूर्ण जगानं भारताला पाठिंबा दिला आहे. भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्राएलने म्हटलं आहे.    रशियाच्या परदेश मंत्रालय प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी कोणत्याही प्रकरच्या दहशतवादी कृत्याचा रशिया निषेध करत असल्याचं सांगून दहशतवादाचा बीमोड...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.