राष्ट्रीय

May 19, 2025 12:06 PM

views 16

एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा

राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं आहे. हवामान आणि प्रादेशिकतेच्या अत्यंत कठीण आव्हानांचा सामना करत या 18-19 वर्षांच्या छात्रांनी एव्हरेस्टवर तिरंगा आणि एनसीसीचा ध्वज फडकवला. सियाचीन इथल्या लष्कराच्या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत एन...

May 19, 2025 11:31 AM

views 37

शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक

मे महिन्यात भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे. जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत परिस्थितीत झालेली सुधारणा यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 18 हजार 620 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काला...

May 19, 2025 11:27 AM

views 18

परराष्ट्र व्यवहार मंत्री सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना होतील. या दौऱ्यात ते नेदरलँडस, डेन्मार्क आणि जर्मनीला भेट देऊन तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यामध्ये परस्पर हिताच्या क्षेत्रिय आणि जागतिक मुद्द्यांवरदेखील चर्चा होईल.

May 19, 2025 10:27 AM

views 20

ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य करण्याचं सामर्थ्यं दाखवून दिलं

तीनही सैन्यदलांच्या योग्य समन्वयातून, धोरणात्मक सखोलता दर्शवत आणि तांत्रिक वर्चस्वाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा होता असं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य...

May 18, 2025 8:39 PM

views 27

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ७ सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं जाहीर

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. या संदर्भात, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपा खासदार ...

May 18, 2025 8:34 PM

views 10

हैद्राबादच्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत १७, तर सोलापूरात कारखान्यात आगीत ८ जणांचा मृत्यू

हैद्राबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधे ८ लहान मुलं आणि ६ महिलांचा समावेश आहे. गजबजलेल्या परिसरातल्या या दुमजली इमारतीत शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ८ जणांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला, तर ९ जण उपचारादरम्...

May 18, 2025 8:27 PM

views 11

विकसित भारत घडवण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर भर द्यावा लागेल-केंद्रीय कृषीमंत्री

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा तिचा आत्मा आहे. त्यामुळेच विकसित भारत घडवायचा असेल तर विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. नागपूर इथे विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीवेळी ते बोलत होते...

May 18, 2025 3:12 PM

views 11

बांगलादेशातून आयात होणाऱ्या मालावर नवे निर्बंध

बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंसाठी परदेश व्यापार महासंचालनालयानं नवीन निर्बंध घातले आहेत. बांगलादेशातून सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या आयातीला भूपृष्ठ-मार्गे बंदी असेल, पण न्हावा शेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांमधून या वस्तूंच्या आयातीला परवानगी असेल. त्याशिवाय, फळं, फळांच्या स्वादाची आणि...

May 17, 2025 3:07 PM

views 30

लवकरच २० रुपये मूल्य असलेल्या नवीन नोट चलनात येणार

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल. आर बी आय नं आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. महात्मा गांधी मालिकेतल्या या नोटा आधीच्या नोटांसारख्याच आहेत तसंच याआधीच्या नोटाही चलनात लागू राहणार...

May 17, 2025 2:56 PM

views 5

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या मार्गावर रेल्वे गाडी चालवण्यात येणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित ठिकाणांचं दर्शन घडवणारं 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या मार्गावर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे .   भारत गौरव टूरीस्ट ट्रेन अंतर्गत आयोजित ही रेल्वे सहल येत्या नऊ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.