राष्ट्रीय

April 29, 2025 9:10 PM April 29, 2025 9:10 PM

views 14

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, सेनाप्रमुख सीडीएस अनिल चौहन तसंच तिन्ही सेनादलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.

April 29, 2025 3:39 PM April 29, 2025 3:39 PM

views 5

वेव्हज् परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल- डॉ. एल. मुरुगन

वेव्हज् २०२५ परिषद मुंबईत सुरु होत आहे. या परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी म्हटलं आहे.   वेव्हजच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्यविकास, स्वयंउद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील, असा...

April 29, 2025 3:35 PM April 29, 2025 3:35 PM

views 6

भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक- प्रधानमंत्री

शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात देशाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी, भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतासाठी शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्राला एकत्रित आणणाऱ्या युग्म संमेलनात ते बोलत होते. नवी दिल्ली...

April 29, 2025 3:24 PM April 29, 2025 3:24 PM

views 5

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.    राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच त्यांच्या कुटुंबिया...

April 29, 2025 3:19 PM April 29, 2025 3:19 PM

views 15

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र घेण्याची पक्षनेत्यांची मागणी

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी केली आहे. तसं पत्र त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्या...

April 29, 2025 3:12 PM April 29, 2025 3:12 PM

views 4

काश्मीर खोऱ्यातली  ४८ पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद

पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातली  ४८ पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जम्मू कश्मीर सरकारने घेतला आहे.   खोऱ्यात एकूण ८७ पर्यटनस्थळं आहेत. इतर स्थळांना योग्य सुरक्षा पुरवल्याचं सरकारनं म्हटलं आहे. पहेलगाम ह्ल्ल्यानंतर काश्मीरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या...

April 29, 2025 2:47 PM April 29, 2025 2:47 PM

views 5

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शाजी एन करुण यांचं निधन

सुप्रसिद्ध मल्ल्याळी चित्रपट दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक शाजी एन करुण यांचं काल तिरुवनंतपुरम इथं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.   मल्याळम सिनेमा जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पहिल्याच पिरावी या चित्रपटाला ७० हून अधिक आंतरराष...

April 29, 2025 2:43 PM April 29, 2025 2:43 PM

views 10

अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना काल पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाणे, टिळकनगर पोलीस ठाणे, खडकपाडा आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

April 29, 2025 2:42 PM April 29, 2025 2:42 PM

views 2

भारत पाकिस्तान सीमेलगतच्या गावातून हेरॉईन आणि ड्रोन जप्त

सीमा सुरक्षा दलानं आज भारत पाकिस्तान सीमेलगतच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या गावातून हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा आणि ड्रोन जप्त केले. रत्तर चत्तर गावातल्या एका शेतात संशयास्पद स्थितीतला एक खोका जप्त करण्यात आला.   त्यात साडेआठ किलो वजनाची अंमली पदार्थाची ८ पाकिटं आढळली. तसंच या भागात एका ड्रोनच...

April 29, 2025 2:32 PM April 29, 2025 2:32 PM

परशुराम जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन

परशुराम जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान परशुराम यांचे आशीर्वाद प्रत्येकाचं जीवन धैर्य आणि शक्तीने भरतील अशी अपेक्षा, मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.