राष्ट्रीय

April 30, 2025 7:33 PM April 30, 2025 7:33 PM

views 11

केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार

आगामी जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. ...

April 30, 2025 4:31 PM April 30, 2025 4:31 PM

views 9

प्रधानमंत्री उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.  मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या वेव्हज परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील. शुक्रवारी ते केरळला रवाना होणार असून तिथं विळिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करतील. त्यानंतर आंध्रप्रदेशातल्य...

April 30, 2025 4:32 PM April 30, 2025 4:32 PM

views 14

न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील महिन्याच्या १४ तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री ...

April 30, 2025 4:22 PM April 30, 2025 4:22 PM

views 7

कोलकाता इथं एका हॉटेलला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मध्य कोलकाता इथं एका हॉटेलला  काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आतापर्यंत १४ मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढले असून आगीचं  कारण अद्याप कळलेलं  नाही.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प...

April 30, 2025 4:25 PM April 30, 2025 4:25 PM

views 10

आंध्र प्रदेशात मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणमजवळ सिंहाचलम मंदिरात आज सकाळी दर्शन रांगेजवळची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे एक तंबू कोसळल्यानंतर ही भिंत कोसळली. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या बचाव पथकांनी  घटनास्थळी मदत कार्य सुरु केलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णा...

April 30, 2025 1:41 PM April 30, 2025 1:41 PM

views 9

नवी दिल्लीत येत्या ३ मे पासून मध्यस्थ संघटनेच्या परिषदेचं आयोजन

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सहकार्याने भारताच्या महाधिवक्ता कार्यालयातर्फे पुढच्या महिन्यात ३ तारखेला नवी दिल्ली इथे मध्यस्थ संघटनेची एक परिषद आयोजित केली जात आहे. या परिषदेत मध्यस्थ तसंच मध्यस्थ संस्थांना एकत्र आणून मध्यस्थी प्रक्रिये संदर्भातल्या सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा होणार आहे, अशी माहिती म...

April 30, 2025 1:38 PM April 30, 2025 1:38 PM

views 6

भारत आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कासंदर्भातली बोलणी चांगल्या पातळीवर सुरु-डोनाल्ड ट्रंप

भारत आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कासंदर्भातली बोलणी चांगल्या पातळीवर सुरु असून लवकरच व्यापार करार यशस्वी होईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. ते काल मिशिगनमध्ये वार्ताहरांसी बोलत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करणाऱ्या पहिल्या दे...

April 30, 2025 1:33 PM April 30, 2025 1:33 PM

views 6

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर

जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर काल रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरच्या समोरच्या भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. तसंच पाकिस्तानी सैन्यानं बारामुल्ला आणि कुप...

April 30, 2025 1:23 PM April 30, 2025 1:23 PM

views 7

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरची मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठकही आज होणार  आहे.

April 30, 2025 1:17 PM April 30, 2025 1:17 PM

views 15

हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा पंजाबचा आरोप

हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी केला आहे. पंजाबमध्ये पाणीसाठा कमी असूनही माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हरयाणाला आधीच ४ हजार क्युसेक पाणी दिलं आहे. मात्र, आता आपल्या राज्यात इतर राज्यांना देण्यासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं मान ए...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.