राष्ट्रीय

May 9, 2025 1:27 PM May 9, 2025 1:27 PM

views 3

नवी दिल्लीतल्या आयकर कार्यालय परिसरात एअर रेड सायरनचा सराव होणार

नागरी संरक्षण संचालनालयाकडून आज नवी दिल्लीतल्या आयकर कार्यालय परिसरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयात एअर रेड सायरनचा सराव घेण्यात येणार आहे. ही चाचणी दुपारी तीन वाजता सुरू होईल आणि ती पुढची १५ ते २० मिनिटं चालेल. या सरावादरम्यान, सामान्य जनतेने शांत राहावं, घाबरून जाऊ नये, असा सल्ला जिल...

May 9, 2025 1:22 PM May 9, 2025 1:22 PM

views 4

इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत – IOCL

देशात इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत सुरू असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड- IOCLनं दिली.  नागरिकांनी घाबरून न जाता इंधनाचा अतिरीक्त साठा करू नका आणि अनावश्यक गर्दी टाळा  असं आवाहनही IOCL नं केलं आहे. देशातल्या सर्व केंद्रांवर इंधन आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचंही आयओस...

May 9, 2025 1:48 PM May 9, 2025 1:48 PM

views 11

पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ

भारताच्या  उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला आहे. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला परंतु भारतीय लष्कराने तत्पर कारवाई करत तो राख...

May 8, 2025 8:19 PM May 8, 2025 8:19 PM

views 17

…तर, पाकिस्तानाला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारताचा इशारा

IndiaPakistanWar यापुढं केलेली कोणतीही आगळीक केवळ परिस्थिती चिघळवणारी असेल, आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा भारतानं दिला आहे.    सध्या पाकिस्तानबाबत सुरू असलेली परिस्थिती आणखी चिघळवण्याचा भारताचा हेतू नाही, मात्र लष्करी हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं परर...

May 8, 2025 7:33 PM May 8, 2025 7:33 PM

views 6

ITI मध्ये नव्या अभ्यासक्रमाची घोषणा…

‘आयटीआय’ मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमाची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून, येत्या शैक्षण...

May 8, 2025 8:26 PM May 8, 2025 8:26 PM

views 13

भारतीय हल्ल्यात पाकिस्तानची संरक्षण प्रणाली नष्ट

भारतीय संरक्षण दलानं आज सकाळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला. यात लाहोर इथली संरक्षण प्रणाली नष्ट झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.    पाकिस्ताननं भारतातल्या  श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, जल...

May 8, 2025 7:57 PM May 8, 2025 7:57 PM

views 43

OTT, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी अधिकृत सूचना

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज देशातले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यांच्यासाठी अधिकृत सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा जपण्याच्या दृष्टीनं या प्लॅटफॉर्म्सवर कोणत्याही प्रकारची पाकिस्तानी आशय सामुग्री प्रसारित केली जाऊ नये, असं प्रसारण तात्काळ बंद करावं, असे निर्दे...

May 8, 2025 6:53 PM May 8, 2025 6:53 PM

views 31

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभाग आणि मंत्रालयाच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक झाली. मंत्रालयाचे विविध विभाग आणि सुरक्षा यंत्रणांमधे समन्वयाची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त  केली.  देशातल्या  सद्याच्या स्थितीचा सामना कर...

May 8, 2025 8:21 PM May 8, 2025 8:21 PM

views 6

सर्वपक्षीय बैठकीत ऑपरेशन सिंदूरचं एकमुखी समर्थन

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे,...

May 8, 2025 3:59 PM May 8, 2025 3:59 PM

views 3

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याचं सीमा सुरक्षा दलानं सांगितलं. अंधाराचा फायदा घेत तो भल्या पहाटे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, अटारी, हुसेनीवाला आणि सदकी इथल्या सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत.