राष्ट्रीय

June 1, 2025 6:14 PM

views 100

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निबंध स्पर्धांच आयोजन

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं संरक्षण मंत्रालय आणि माय जी.ओ.व्ही. इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातल्या युवा वर्गासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली.    याअंतर्गत ऑपरेशन सिंदूर - दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणाची नवी परिभाषा या...

June 1, 2025 4:59 PM

views 7

वन्यजीवांची तस्करी करत असलेल्या व्यक्तीला अटक

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीवांची तस्करी करत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून विविध प्रजातींचे 52 जिवंत आणि १ मृत वन्यजीव जप्त केले आहेत. यात शिंगासारख्या शेपटाचे ३ विषारी जातीचे जिवंत साप अर्थात स्पाय...

June 1, 2025 3:40 PM

views 23

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल फ्रान्स आणि इटली दौऱ्यासाठी रवाना

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. युरोपमधल्या भारताच्या प्रमुख भागीदार देशांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणं, तसंच प्रत्येक परिस्थितीला अनुकूल आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाच्या परस्पर सामायिक दृष्टीकोनानं पुढे वाटचाल करणं हा य...

June 1, 2025 3:09 PM

views 18

व्यावसायिक गॅस सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त

देशातल्या १९ किलोच्या व्यावसायिक  गॅस सिलिंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत १ हजार ७२३ रुपयांना, मुंबईत १ हजार ६७४ रुपये, कोलकाता १ हजार ८२६, चेन्नईत १ हजार ८८१, बंगळुरूत १ हजार ७९६, नोएडा १ हजार ७२३ आणि चंडीगडमधे १ हजार ७४३...

June 1, 2025 1:57 PM

views 16

आज जागतिक दूध दिवस साजरा

लाखो लोकांच्या उपजीविकेचा स्रोत तसंच जागतिक अन्न म्हणून दुधाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज जागतिक दूध दिवस साजरा होत आहे. जागतिक पातळीवर दुधाचं उत्पादन दोन टक्क्यानी वाढतं. पण भारतात वाढीचं प्रमाण ५ पूर्णांक ७ दशांश टक्के आहे. त्यामुळे जगातला सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून भारत ओळखला ...

June 1, 2025 1:56 PM

views 10

सिक्किममधे भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत

सिक्किममधे भूस्खलनामुळे मंगन जिल्हयात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लाचेन आणि लचुंग इथं जवळपास दीड हजार पर्यटक अडकून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रस्त्यावरचा मलबा काढून रस्ते मोकळे करण्याचं काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांनी बाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनानं दिला...

June 1, 2025 1:43 PM

views 20

विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू

मंगोलियातल्या उलानबातर इथल्या विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. कालपासून सुरू झालेला हा सराव येत्या १३ तारखेपर्यंत सुरू राहील. यात भारत आणि मंगोलियातल्या वाढत्या संरक्षण सहकार्याला प्रतिबिंबित करणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश असेल. या सरावसत्राचं उद्घाटन मंगोल...

June 1, 2025 1:38 PM

views 12

देशभरात पंचविसाव्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाअंतर्गत आज देशभरात एक विशेष तिरंगा रॅली काढली जात आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून या विशेष रॅलीचं नेतृत्व करतील. ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू योगेश्वर दत्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सरिता मोर, अभिनेत्री शर्वरी...

June 1, 2025 1:35 PM

views 21

देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नसल्याची बसपाच्या प्रमुख मायावती यांची टीका

उत्तरप्रदेशासह देशभरात सामंतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वर्चस्वामुळे जातीय भेदभाव आणि हिंसेसारख्या घटना घडत आहेत. यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नाही हे दिसतं, असं बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशाने देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली पाह...

June 1, 2025 1:29 PM

views 19

केंद्रीय गृहमंत्री आजपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शहा यांनी आज कोलकाता इथं सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरटरीचं उद्घाटन केलं. कोलकाता विमानतळावर भाजपा नेते सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचं काल स्वागत केलं. शहा आज भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत संबोधिक करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.