राष्ट्रीय

May 18, 2025 8:34 PM May 18, 2025 8:34 PM

views 6

हैद्राबादच्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत १७, तर सोलापूरात कारखान्यात आगीत ८ जणांचा मृत्यू

हैद्राबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधे ८ लहान मुलं आणि ६ महिलांचा समावेश आहे. गजबजलेल्या परिसरातल्या या दुमजली इमारतीत शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ८ जणांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला, तर ९ जण उपचारादरम्...

May 18, 2025 8:27 PM May 18, 2025 8:27 PM

views 4

विकसित भारत घडवण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर भर द्यावा लागेल-केंद्रीय कृषीमंत्री

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा तिचा आत्मा आहे. त्यामुळेच विकसित भारत घडवायचा असेल तर विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. नागपूर इथे विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीवेळी ते बोलत होते...

May 18, 2025 3:12 PM May 18, 2025 3:12 PM

views 1

बांगलादेशातून आयात होणाऱ्या मालावर नवे निर्बंध

बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंसाठी परदेश व्यापार महासंचालनालयानं नवीन निर्बंध घातले आहेत. बांगलादेशातून सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या आयातीला भूपृष्ठ-मार्गे बंदी असेल, पण न्हावा शेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांमधून या वस्तूंच्या आयातीला परवानगी असेल. त्याशिवाय, फळं, फळांच्या स्वादाची आणि...

May 17, 2025 3:07 PM May 17, 2025 3:07 PM

views 13

लवकरच २० रुपये मूल्य असलेल्या नवीन नोट चलनात येणार

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल. आर बी आय नं आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. महात्मा गांधी मालिकेतल्या या नोटा आधीच्या नोटांसारख्याच आहेत तसंच याआधीच्या नोटाही चलनात लागू राहणार...

May 17, 2025 2:56 PM May 17, 2025 2:56 PM

views 2

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या मार्गावर रेल्वे गाडी चालवण्यात येणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित ठिकाणांचं दर्शन घडवणारं 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या मार्गावर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे .   भारत गौरव टूरीस्ट ट्रेन अंतर्गत आयोजित ही रेल्वे सहल येत्या नऊ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दि...

May 17, 2025 2:00 PM May 17, 2025 2:00 PM

views 21

आयसीसीचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांसंदर्भात सुरु असलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी राजीनामा दिला आहे.   खान यांच्यावर आपल्या महिला सहकाऱ्याबरोबर गैरवर्तन केल्याचा...

May 17, 2025 1:57 PM May 17, 2025 1:57 PM

views 4

ईशान्य भारतात पुढले ७ दिवस वादळी पावसाची शक्यता

ईशान्य भारतात पुढले सात दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून  अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये आज जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, तर आंध्रप्रदेशची किनारपट्टी, कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करैकल आणि तेलंगणात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.    दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि नै...

May 17, 2025 1:55 PM May 17, 2025 1:55 PM

views 2

युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका प्रवासी बसमधले ९ जण ठार

युक्रेनच्या ईशान्य भागात रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका प्रवासी बसमधले ९ जण ठार झाले. या हल्ल्यात बिलोपिलिया शहरातले ४ नागरिक जखमी झाल्याचं स्थानिक लष्करी सूत्रांनी सांगितलं.   २०२२ सालानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये पहिल्यांदाच थेट चर्चा झाल्यानंतर काही तासांमध्येच हा हल्ला झाला. या चर्चेत क...

May 17, 2025 1:40 PM May 17, 2025 1:40 PM

views 8

आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन

जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. उच्च रक्तदाब आणि त्याचे विविध अवयवांवर होणारे दुष्परिणाम तसंच उच्च रक्तदाबाच्या प्रतिबंधक उपायांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, तो नियंत्रित करा आणि दीर्घायुषी ...

May 17, 2025 1:33 PM May 17, 2025 1:33 PM

views 7

देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन

भारतीय सेनादलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे आज छत्तीसगड, आणि उत्तरप्रदेशात तिरंगा यात्रा काढम्यात आली. महाराष्ट्रातही जनसामान्यांमधे ऑपरेशन सिंदूर बद्द्ल अभिमान आणि गौरवाची भावना व्यक्त होत आहे.   माजी सेनाधिकारी...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.