राष्ट्रीय

May 19, 2025 7:28 PM May 19, 2025 7:28 PM

views 3

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी अकरावीच्या  ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये  विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल.   २० मे रोजी मध्य...

May 19, 2025 1:45 PM May 19, 2025 1:45 PM

views 15

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.   राजस्थानच्या जोधपूर इथं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रा काढली होती. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी एक देश, एक धडकन अशा घोषणा दिल्या.   भारतीय सशस्त्र दला...

May 19, 2025 1:42 PM May 19, 2025 1:42 PM

views 68

युद्धबंदी संपण्याची कोणतीही तारीख देण्यात आली नाही- भारतीय लष्कर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला शस्त्रसंधी काल संपल्याचा दावा करणारं वृत्त भारतीय लष्करानं फेटाळून लावलं.   भारत आणि पाकिस्तान यांच्या सैनिकी कारवाई महासंचालकांमधे १८ मे रोजी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, १२ मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला होता, शस्त्रसंधी संपण्याची कोणतीही...

May 19, 2025 1:38 PM May 19, 2025 1:38 PM

views 7

सरकारी ई मार्केटप्लेसमुळे भ्रष्टाचार निर्मूलन झालं आहे- पीयूष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ उद्दीष्ट पूर्ततेसाठी  डिजिटल सार्वजनिक खरेदी व्यासपीठ - सरकारी ई-मार्केटप्लेस हे एक महत्त्वाचे इंजिन आहे, असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी  एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात नमूद केलं आहे.     सरकारी ई मा...

May 19, 2025 1:27 PM May 19, 2025 1:27 PM

views 5

उपग्रह प्रक्षेपणातील अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोकडून समिती स्थापन

पीएसएलव्ही अग्निबाणाद्वारे पृथ्वी निरीक्षण उपग्रह, ईओएस-09 कक्षेत स्थापित करण्यात अपयश आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक समिती स्थापन केली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की समितीने काल व्यापक चर्चा केली.   संबंधित अग्निबाणाने चारपैकी पहि...

May 19, 2025 12:06 PM May 19, 2025 12:06 PM

views 7

एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा

राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं आहे. हवामान आणि प्रादेशिकतेच्या अत्यंत कठीण आव्हानांचा सामना करत या 18-19 वर्षांच्या छात्रांनी एव्हरेस्टवर तिरंगा आणि एनसीसीचा ध्वज फडकवला. सियाचीन इथल्या लष्कराच्या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत एन...

May 19, 2025 11:31 AM May 19, 2025 11:31 AM

views 23

शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक

मे महिन्यात भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे. जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत परिस्थितीत झालेली सुधारणा यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 18 हजार 620 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काला...

May 19, 2025 11:27 AM May 19, 2025 11:27 AM

views 8

परराष्ट्र व्यवहार मंत्री सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना होतील. या दौऱ्यात ते नेदरलँडस, डेन्मार्क आणि जर्मनीला भेट देऊन तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यामध्ये परस्पर हिताच्या क्षेत्रिय आणि जागतिक मुद्द्यांवरदेखील चर्चा होईल.

May 19, 2025 10:27 AM May 19, 2025 10:27 AM

views 13

ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य करण्याचं सामर्थ्यं दाखवून दिलं

तीनही सैन्यदलांच्या योग्य समन्वयातून, धोरणात्मक सखोलता दर्शवत आणि तांत्रिक वर्चस्वाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा होता असं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य...

May 18, 2025 8:39 PM May 18, 2025 8:39 PM

views 14

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ७ सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं जाहीर

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. या संदर्भात, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपा खासदार ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.