राष्ट्रीय

May 22, 2025 3:19 PM May 22, 2025 3:19 PM

views 1

दिल्लीत वादळामुळे दोघांचा मृत्यू

दिल्लीत काल संध्याकाळी  आलेल्या  मोठ्या वादळामुळं दोन जणांचा मृत्यू झाला. या वादळामुळं घरं कोसळली, झाडं आणि विजेचे खांब कोसळून मोठं नुकसान झालं आहे. तसंच दिल्ली मेट्रो, रस्ते वाहतूक आणि विमान सेवांवर परिणाम झाला आहे,  अशी माहिती  दिल्ली अग्निशमन दलानं दिली आहे.  

May 22, 2025 2:53 PM May 22, 2025 2:53 PM

views 14

नैऋत्य मान्सून लवकर सुरु होण्याची शक्यता

नैऋत्य मान्सून यंदा लवकर सुरु होण्याची शक्यता असून, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये तो केरळमध्ये प्रवेश करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये पुढले २ ते ३ दिवस जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे.    आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरासह ईशान्...

May 22, 2025 2:49 PM May 22, 2025 2:49 PM

views 24

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याचं निलंबन

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं असून त्यांना २४ तासाच्या आत पाकिस्तान सोडायलाही सांगण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांची वर्तणूक पदाला साजेशी नसल्याचं कारण देत हे आदेश देण्यात आल्याचं पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. या आधी भारतानंही पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला ...

May 22, 2025 1:21 PM May 22, 2025 1:21 PM

views 6

कैलास मानसरोवर यात्रेसाठी ७५० यात्रेकरुंची निवड

कैलास मानसरोवर यात्रेसाठी यंदा ७५० यात्रेकरुंची ऑनलाईन संगणकीय सोडतीद्वारे काल निवड करण्यात आली. पहिली तुकडी येत्या ३० जूनला रवाना होईल, २५ ऑगस्टपर्यंत प्रत्येकी ५० यात्रेकरुंच्या १५ तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील. यापैकी पाच तुकड्या लिपुलेखमार्गे तर दहा तुकड्या नथुलामार्गे जातील.

May 22, 2025 1:10 PM May 22, 2025 1:10 PM

views 13

जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू आणि काश्मीरमध्ये, किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चतरू इथल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून लष्करानं स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं शारी आणि मंद्राल ढोक परिसरातल्या जंगलात ही मोहीम राबवली.  २ ते ३ दहशतवादी सुरक्षा दलाच्या जाळ्या...

May 22, 2025 10:10 AM May 22, 2025 10:10 AM

views 12

देशातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये पुढच्या 2-3 दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांही येत्या रविवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांत तसंच दिल्ली राजधानी क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज ...

May 22, 2025 1:22 PM May 22, 2025 1:22 PM

views 7

प्रधानमंत्र्याच्या हस्ते १०३ पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमधील बिकानेर इथं अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. रेल्वे, रस्ते, उर्जा, पाणी आणि नवीन तसंच नवीकरणीय उर्जा क्षेत्रातले हे प्रकल्प आहेत. याच कार्यक्रमात प्रधानमंत्री 103 पुनर्विकसित अमृत भारत स्थानकांचंही उद्घाटन करणार ...

May 21, 2025 3:42 PM May 21, 2025 3:42 PM

views 16

पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर

माजी सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला आज सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला. पूजा खेडकर तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचा आणि तिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या पीठानं फेटाळून ला...

May 21, 2025 3:52 PM May 21, 2025 3:52 PM

views 18

भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळं रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणांतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगाप...

May 21, 2025 3:52 PM May 21, 2025 3:52 PM

views 3

छत्तीसगडमध्ये चकमकीत २० हून अधिक माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगडच्या नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा भागात सुरक्षादलांशी ५० तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत वीसपेक्षा जास्त माओवादी ठार झाले. यात काही कुख्यात माओवाद्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. यात एक जवान शहीद झाल्याची तर आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा या...