राष्ट्रीय

May 30, 2025 7:49 PM May 30, 2025 7:49 PM

views 3

आसामला उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी

नैऋत्य मान्सूनमुळे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आसाममध्ये, राजधानी गुवाहाटीत पुराचा धोका निर्माण झाला आहे, ब्रह्मपुत्रा आणि इतर प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत, यामध्ये भरालू आणि बहिनी नद्यांचा  समावेश  आहे.   राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं गुवाहाटीच्या अनेक सखल ...

May 30, 2025 3:08 PM May 30, 2025 3:08 PM

views 14

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूंछ शहराला भेट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात सीमावर्ती भागातल्या मालमत्ता आणि धार्मिक स्थळांना झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूंछ शहराला भेट दिली. तसंच पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्या तक...

May 30, 2025 3:32 PM May 30, 2025 3:32 PM

views 14

संरक्षण मंत्रालयाच्या ३ कंपन्यांना मिनीरत्न श्रेणी-१ दर्जा मंजूर

संरक्षण मंत्रालयानं म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनीरत्न श्रेणी-१ दर्जा मंजूर केला आहे. केवळ तीन वर्षात सरकारी संस्थांमधून नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सार्वजनिक क्षेत...

May 30, 2025 2:40 PM May 30, 2025 2:40 PM

views 16

पुण्यात १ जूनला गुंतवणूकदार शिबिराचं आयोजन

केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने अर्थात आयईपीएफए ने भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या सहकार्याने गुंतवणूकदार शिबिर या उपक्रमाची घोषणा केली आहे.  आयईपीएफए चं  पहिलं शिबीर १ जून रोजी पुणे इथं होईल. 

May 30, 2025 1:21 PM May 30, 2025 1:21 PM

views 17

वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल – RBI

चालू आर्थिक वर्षात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सरकारचा भांडवली खर्चावर भर, खासगी क्षेत्राची वाढ, बँका आणि भांडवली बाजारांचा अचूक ताळेबंद यामुळे भारताची अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहिल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. उत्पादन क्षेत्रात च...

May 30, 2025 1:42 PM May 30, 2025 1:42 PM

views 18

कर्नाटकमध्ये मंगळुरू जिल्ह्यात भूस्खलनात एका मुलीचा मृत्यू

कर्नाटकमध्ये मंगळुरू जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मंगळुरू विभागात २ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

May 30, 2025 1:15 PM May 30, 2025 1:15 PM

views 5

उत्तर प्रदेशात बस अपघातात ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यात आज सकाळी बादलपूरहून जौनपूरला जाणारी एक खाजगी बस उलटल्यानं किमान चार जणांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी यांनी ही माहिती दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस सुमारे ८० किमी प्रतितास वेगाने धावत होती. तेव्हा चालकाचं नियंत्रण सुटल्याम...

May 30, 2025 1:13 PM May 30, 2025 1:13 PM

views 13

पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, ३४ जखमी

पंजाबमध्ये, श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातल्या लांबी भागात काल रात्री उशिरा एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३४ जण जखमी झाले आहेत. पोलिस उपअधीक्षक जसपाल सिंह यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे आणि ते विविध रुग्णालयात उपचार घ...

May 30, 2025 1:39 PM May 30, 2025 1:39 PM

views 9

गोवा राज्याच्या स्थापनादिवसानिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

गोवा राज्याच्या स्थापनादिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्याची समृद्ध परंपरा, पाहुणचार करण्याची वृत्ती, निसर्गरम्य समुद्रकिनारे यांचं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे विशेष उल्लेख केला. गोव्याचा समृद्ध वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी...

May 30, 2025 1:05 PM May 30, 2025 1:05 PM

views 2

नवी दिल्लीत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा प्रारंभ

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी काल नवी दिल्ली इथं जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे आयोजित देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी "मापन ते व्यवस्थापन" या तत्वाचं  महत्व पुन्हा एकदा अधोरेखित के...