राष्ट्रीय

June 19, 2025 3:14 PM June 19, 2025 3:14 PM

views 5

‘जेंडर बजेटिंग पोर्टलचं’ अन्नपूर्णा देवी यांच्याहस्ते उदघाटन

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘जेंडर बजेटिंग पोर्टलचं’ उदघाटन केलं.   हे पोर्टल धोरणकर्ते आणि भागधारकांना लैंगिक समानतेवर आधारित अर्थसंकल्पीय पद्धती बळकट करण्यासाठी सुविधा केंद्र म्हणून काम करेल, अशी माहिती अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी दिली.    ...

June 19, 2025 3:07 PM June 19, 2025 3:07 PM

views 8

स्थानिक भाषांसह जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली असल्याचं अमित शहा प्रतिपादन

देशाचा भाषिक वारसा अभिमानानं मिरवून, स्थानिक भाषांसह जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परकीय भाषांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास चांगल्या पद्धतीने समजत नाही. त्यासाठी स्थानिक भाषाच...

June 19, 2025 2:53 PM June 19, 2025 2:53 PM

views 10

क्रोएशियाच्या दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला पाच दिवसांचा परदेश दौरा पूर्ण करून आज क्रोएशिया इथून मायदेशी परतले. प्रधानमंत्री मोदी यांचा क्रोएशियाचा हा पहिलाच  दौरा होता. त्यांच्या या दौऱ्यात झालेल्या उच्चस्तरीय भेटींनी दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या धोरणात्मक सहकार्याचा मार्ग मोकळा केला.     प्रधानमंत्री म...

June 19, 2025 2:44 PM June 19, 2025 2:44 PM

views 17

मुंबईसह कोकणातल्या सागरी किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यावेळी लहान बोटींनी समुद्रात जाऊ नये, तसंच किनारपट्टी जवळ पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णपणे थांबवाव्यात असे निर्देश राज्य आपत्कालीन केंद्रानं दिले आहेत.    पालघर पुणे आणि ना...

June 19, 2025 1:22 PM June 19, 2025 1:22 PM

views 14

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिक अटक

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. पल्लदम इथं काही नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर त्यांच्या घरांवर छापा घातला असता, बनावट कागदपत्रे, आधार कार्ड आढळून आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

June 19, 2025 1:19 PM June 19, 2025 1:19 PM

views 2

दिवंगत नबा किशोर दास यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

आर्थिक गैरव्यहार केल्याप्रकरणी ओदिशातले बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते दिवंगत नबाकिशोर दास यांच्याशी संबंधित असलेल्या २० मालमत्तांवर आयकर विभागानं एकाच वेळी आज छापे टाकले. झारसुगुडा, संबलपूर आणि नवी दिल्लीत असलेल्या मालमत्तांवर एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले आहेत.     दास यांच्या कार्यकाळात कोळसा...

June 19, 2025 1:11 PM June 19, 2025 1:11 PM

views 13

 नीट एमबीबीएस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी ठिकठिकाणी ED चे आज छापे

 नीट एमबीबीएस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये पाटणा, झारखंडमध्ये रांची आणि इतर काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील मुख्य सूत्रधार संजीव मुखिया आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती अधिकृत सू...

June 19, 2025 1:03 PM June 19, 2025 1:03 PM

views 2

अहमदाबाद विमान अपघातातील १८७ मृतदेह कुटुबांकडे सुपूर्द

अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघातातल्या किमान २१० मृतांची डीएनए नमुने जुळवून ओळख पटवण्यात आली आहे. आतापर्यंत १८७ मृतदेह त्यांच्या कुटुबांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिली आहे.

June 19, 2025 2:59 PM June 19, 2025 2:59 PM

views 42

ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ख्यातनाम वन्य जीव अभ्यासक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चितमपल्ली यांचं काल संध्याकाळी वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. जंगल आणि वन्य प्राण्यांवर प्रेम करणारे चितमपल्ली यांना ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखलं जातं.    ...

June 19, 2025 12:50 PM June 19, 2025 12:50 PM

views 14

ऑपरेशन सिंधू : उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान नवी दिल्लीत दाखल

ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झालं. इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू ही मोहीम आखली आहे.   पहिल्या टप्प्यात ११० विद्यार्थ्यांना इ...