राष्ट्रीय

June 20, 2025 2:17 PM June 20, 2025 2:17 PM

views 12

केंद्रीय गृहमंत्री आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात होणार सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सहभागी होणार आहेत. तसंच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. अमित शहा यांनी काल बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्...

June 20, 2025 2:08 PM June 20, 2025 2:08 PM

views 18

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. कांकेर जिल्ह्यातल्या अमाटोला आणि कालपर भागातल्या जंगलात ही चकमक झाली. जिल्हा राखीव दल, सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांची पथकं परिसराची कसून तपासणी करत आहेत.

June 20, 2025 2:06 PM June 20, 2025 2:06 PM

views 10

तांत्रिक आणि देखभालीच्या कारणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा एअर इंडियाचा निर्णय

एअर इंडियानं तांत्रिक आणि देखभालीच्या कारणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करायचा निर्णय घेतला आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वी अतिरिक्त सुरक्षा खबरदारी घेणं, तसंच मध्य पूर्वेत हवाई सीमा बंद झाल्यामुळे वाढलेल्या फेऱ्या लक्षात घेऊन बोइंग ७८७ आणि ७७७ या विमानांच्या फेऱ्या कमी करायचा निर्णय घेतल्या...

June 20, 2025 2:03 PM June 20, 2025 2:03 PM

views 4

पॅलेडियम, रोडियम आणि इरिडियम या मिश्र धातूंच्या आयातीवर डीजीएफटीने घातली बंदी

वजनात एक टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात सोनं असलेल्या काही मिश्र धातूंच्या आयातीवर डीजीएफटी अर्थात परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने बंदी घातली आहे. एक टक्क्यापेक्षा जास्त सोनं असलेल्या पॅलेडियम, रोडियम आणि इरिडियम या मिश्रधातूंची आयात तात्काळ प्रतिबंधित करण्यात आल्याचं डीजीएफटीने जारी केलेल्या निवेदन...

June 20, 2025 8:00 PM June 20, 2025 8:00 PM

views 3

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये ५ हजार ९०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण

गेल्या ११ वर्षांत बिहारला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेणारं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे विकासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहार इथे सिवानमध्ये एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. त्यांनी सिवान इथून ५ हजार ९०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं दू...

June 20, 2025 1:40 PM June 20, 2025 1:40 PM

views 21

कैलास मान सरोवर यात्रेला आजपासून सिक्कीम येथून सुरूवात

कैलास मान सरोवर यात्रा आजपासून सिक्कीम इथून सुरू झाली. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी आज सकाळी नथु ला मधून जाणाऱ्या ३६ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या तुकडीत ४३ ते ६९ वर्ष वयोगटातले सदस्य असून त्यातल्या १३ महिला आहेत. ही तुकडी ११ ते १२ दिवसात यात्रा पूर्ण कर...

June 20, 2025 1:34 PM June 20, 2025 1:34 PM

views 6

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन

मराठी मनोरंजन सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं काल निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. उमदं देखणं व्यक्तिमत्व आणि प्रभावी आवाज याच्या जोरावर त्यांनी रंगमंच आणि रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका रंगवल्या. लेखन, दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी काम केलं. शिवाय संगीतातही त्यांची रुची होती. त्यांच्या निधना...

June 20, 2025 2:48 PM June 20, 2025 2:48 PM

views 2

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली रशियाच्या उपपंतप्रधानांची भेट

केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल रशियातील सेंट पीटर्सबर्ग इथ रशियाचे उपपंतप्रधान एलेक्सी ओवरचुक यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी भारत आणि रशिया दरम्यान मुख्यतः परिवहन,संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि दुर्मिळ धातू या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्या...

June 20, 2025 1:46 PM June 20, 2025 1:46 PM

views 18

११व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या १० लाखांच्या वर

अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या २१ जूनला साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमधे भाग घेणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, आंत...

June 20, 2025 10:05 AM June 20, 2025 10:05 AM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं केलं अभिनंदन

लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपदस्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या हौ यिफान हिला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं अभिनंदन केलं आहे. दिव्याचं हे यश तिच्या धैर्य आणि दृढनिश्चयाला अधोरेखि...