राष्ट्रीय

June 24, 2025 2:57 PM June 24, 2025 2:57 PM

views 82

उद्या संविधान हत्या दिवस पाळण्यात येणार

संविधान हत्या दिवस उद्या पाळण्यात येणार आहे. २५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या १८ महिन्यांच्या  काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना त्यानिमित्त आदरांजली वाहण्यात येईल. या निमित्तानं प्रत्येक भारतीयाच्या मनात वैय...

June 24, 2025 3:00 PM June 24, 2025 3:00 PM

views 8

महात्मा गांधी आणि श्रीनारायण गुरू यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

१०० वर्षांपूर्वी श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांची झालेली भेट ही आजही सामाजिक समरसतेसाठी, विकसित भारताच्या उद्देशासाठी उर्जेचा एक स्रोत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्ली इथे भारतातले दोन महान आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्...

June 24, 2025 1:24 PM June 24, 2025 1:24 PM

views 14

ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून २,२९५ भारतीय मायदेशी परतले

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत आत्तापर्यंत इराणमधून २,२९५ भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरुप परत आणलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली. आज पहाटे इराणमधल्या मशहद इथून एका विशेष विमानानं २९२ भारतीय नागर...

June 24, 2025 1:31 PM June 24, 2025 1:31 PM

views 13

SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताचं नेतृत्व करतील

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक यंदा चीनच्या अध्यक्षतेखाली किंगडो इथं होत आहे. या दोन दिवसांच्या बैठकीला उद्या सुरुवात होईल. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात भारताचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होईल. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसंच आं...

June 24, 2025 1:28 PM June 24, 2025 1:28 PM

views 2

लष्करासाठी तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत १,९८१ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी

संरक्षण मंत्रालयानं लष्करासाठीच्या तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत १३ करारांना अंतिम स्वरूप दिलं असून, एकूण १,९८१ कोटी रुपयांची खरेदी केली जाणार आहे. याअंतर्गत एकात्मिक ड्रोन वेधक प्रणाली, हलक्या वजनाचे रडार, कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीसाठीचे प्रक्षेपक  आणि क्षेपणास्त्रे, बुलेट प्रूफ जॅकेट्स...

June 24, 2025 12:56 PM June 24, 2025 12:56 PM

views 16

हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला तात्पुरता आदेश जारी

अमेरिकेतल्या बोस्टन इथले जिल्हा न्यायाधीश ॲलिसन बरोज यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला दुसरा तात्पुरता आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परदेशी विद्यार्थ्यांना, यासंदर्भातला कायदेशीर खटला सुरू असेपर्यंत हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत प्रवास करण्याची परवा...

June 24, 2025 10:43 AM June 24, 2025 10:43 AM

views 2

ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं उद्या प्रक्षेपण

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा समावेश असलेलं ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं प्रक्षेपण उद्या होण्याची शक्यता आहे. नासाच्या अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीनुसार, नासा, ॲक्झीओम स्पेस आणि स्पेसएक्स त्यांच्या या चौथ्या खासगी अंतराळवीर मिशनसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार, उद्या दुपारी...

June 24, 2025 10:41 AM June 24, 2025 10:41 AM

views 16

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी बीजिंगमध्ये चिनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांची भेट घेतली. आशियायी प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या बै...

June 24, 2025 10:39 AM June 24, 2025 10:39 AM

views 7

महात्मा गांधी आणि श्रीनारायण गुरू यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महात्मा गांधी आणि महान आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरू यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या घटनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. 12 मार्च 1925 रोजी शिवगिरी मठात महात्मा गांधी आणि श्री नाराय...

June 24, 2025 9:49 AM June 24, 2025 9:49 AM

views 4

तेलाच्या किमतींमध्ये ५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण

कतारमधील अल उदेद अमेरिकन हवाई तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये पाच वर्षांतील सर्वांत मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली गेली. तेलाच्या किमती प्रति बॅरल पाच डॉलर्सने घसरल्या. ऊर्जा पायाभूत सुविधांना थेट धोका नसल्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी असल्याची खात...