राष्ट्रीय

June 27, 2025 11:00 AM June 27, 2025 11:00 AM

views 16

ॲक्सिओम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

ॲक्सिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ...

June 27, 2025 10:59 AM June 27, 2025 10:59 AM

views 7

शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार

चीनच्या किंगदाओ इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे. घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद, कट्टरतावाद आणि अतिरेकी कारवाया हे प...

June 27, 2025 10:54 AM June 27, 2025 10:54 AM

views 16

मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू

आवश्यक अटी पूर्ण न केल्याबद्दल देशातील 345 नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं सुरू केली आहे. 2019 पासून आतापर्यंत एकही लोकसभा, विधानसभा निवडणूक किंवा पोटनिवडणूक न लढलेल्या पक्षांची नोंदणी या प्रक्रियेत रद्द करण्यात येणार असून त्यापूर्वी त्यां...

June 27, 2025 9:50 AM June 27, 2025 9:50 AM

views 23

आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील एक काळा काळ होता – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द आणीबाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आले होते; ते कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा भाग नव्हते, असं सांगत, याबाबत फेरविचार करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी केलं आह...

June 24, 2025 7:46 PM June 24, 2025 7:46 PM

views 5

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताने स्वागत केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला चर्चेशिवाय पर्याय नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या  देशांनी शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्न करावेत, यात भारत आपली भूमिका निभावण्यासाठी तयार आहे, असं ...

June 24, 2025 6:53 PM June 24, 2025 6:53 PM

views 1

विरोधी पक्षनेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा केलेला आरोप ECIनं फेटाळला

काँग्रेसचे नेते आणि केंद्रातले विरोधी पक्षनेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा केलेला आरोप, भारत निवडणूक आयोगानं फेटाळला आहे.    संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विकेंद्रित पद्धतीनं आणि आणि संसदेनं मंजूर केलेल्या निवडणूक कायद्यांनुसार पार पडल्याचं आयोगानं म्हटलं आहे....

June 24, 2025 6:06 PM June 24, 2025 6:06 PM

views 3

पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारची पीकनिहाय मोहीम सुरू

पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार पीकनिहाय मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेची सुरुवात सोयाबीन पिकापासून इंदूर इथं होईल, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. या मोहिमे अंतर्गत शेतकरी, शास्त्रज्ञ आणि शेतीशी संबंधित लोक एकत्र येऊन सोयाबीनचं उत्पादन वाढवण्याविषयी चर...

June 24, 2025 6:03 PM June 24, 2025 6:03 PM

views 10

गेल्या काही वर्षांत भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या काही वर्षांत भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाले असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ग्रामीण उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी सांंगितलं. एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान य...

June 24, 2025 5:50 PM June 24, 2025 5:50 PM

views 4

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं-प्रधानमंत्री

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ते आज नवी दिल्ली इथं केरळमधील समाजसुधारक श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. दहशतवाद्यांची आश्रयस्थानं आता सुरक्षित न...

June 24, 2025 2:57 PM June 24, 2025 2:57 PM

views 82

उद्या संविधान हत्या दिवस पाळण्यात येणार

संविधान हत्या दिवस उद्या पाळण्यात येणार आहे. २५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या १८ महिन्यांच्या  काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना त्यानिमित्त आदरांजली वाहण्यात येईल. या निमित्तानं प्रत्येक भारतीयाच्या मनात वैय...