राष्ट्रीय

July 14, 2025 10:50 AM July 14, 2025 10:50 AM

views 20

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात त्या भुवनेश्वर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.   तसंच उद्या (मंगळवारी) रेवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती ...

July 14, 2025 10:47 AM July 14, 2025 10:47 AM

views 9

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होत आहेत. शांघाय सहकार्य संघटनेतील 10 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहातील.   या बैठकीत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होणार आह...

July 14, 2025 10:38 AM July 14, 2025 10:38 AM

views 2

बनावट खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश

बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रानं दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.   बनावट खतांची विक्री, खतांचा काळाबाजार यासारख्या बेकायदेशी...

July 14, 2025 10:26 AM July 14, 2025 10:26 AM

views 2

रेल्वेनं सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय

प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वेनं सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व 74 हजार कोच आणि 15 हजार लोकोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मान्यता दिली आहे.   प्रत्येक रेल्वे कोचमध्ये चार डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेर...

July 14, 2025 10:07 AM July 14, 2025 10:07 AM

views 10

प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या 10 वर्षांत 274 टक्के वृद्धी

देशातील एकूण प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या दहा वर्षांत 274 टक्के वृद्धी नोंदवली गेली आहे. अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013-14 आणि 2024-25 या दहा वर्षांच्या काळात, कर विभागाने जारी केलेल्या परताव्यात 474 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर करपरतावा दाखल करणाऱ्या करदात्यांमध्येही 133 टक्क...

July 14, 2025 9:53 AM July 14, 2025 9:53 AM

views 18

ऑपरेशन सिंदूरमधील उल्लेखनीय कामगिरीमुळं ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जागतिक स्तरावर वाढती मागणी

ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, जगभरात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मागणी वाढली असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल सांगितलं.   लखनौ इथं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंग यांच्या हस्त झालं त्यावेळी ते बोलत ह...

July 12, 2025 8:25 PM July 12, 2025 8:25 PM

views 13

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या रोजगार मेळाव्यातून ५१ हजार युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

युवकांचं सक्षमीकरण आणि विकसित भारतात त्यांचं योगदान वाढवण्यासाठी रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला ते संबोधित करत होते. त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध सरकारी विभागांत नव्यानं नियुक्त झ...

July 12, 2025 8:21 PM July 12, 2025 8:21 PM

views 9

भारताची न्यायव्यवस्थेत मोठ्या सुधारणांची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

भारताची न्यायव्यवस्था विलक्षण आव्हानात्मक परिस्थितीत आहे आणि त्यात मोठ्या सुधारणांची गरज आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. हैदराबादमध्ये नालसार विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.   वर्षानुवर्षं चालणारे खटले आणि तुरुंगात खितपत पडलेल्या आरोपींची अवस्था ...

July 12, 2025 8:18 PM July 12, 2025 8:18 PM

views 40

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत शिकवणी वर्ग हे अडथळे असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं मत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत शिकवणी वर्ग हे अडथळे आहेत असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज मांडलं. ट्रिपल आयटी कोटाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शिकवणी वर्गांच्या जाहिरातींवरही त्यांनी आक्षेप घेतला.   या जाहिरातींसाठी पैसा कुठून येतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला...

July 12, 2025 8:13 PM July 12, 2025 8:13 PM

views 10

दिल्लीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू

दिल्लीतल्या सीलमपूर इथं आज सकाळी एक चार मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. पोलीस, एनडीआरएफ आणि स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. इमारतीजवळची गल्ली अरुंद असल्यानं ब...