राष्ट्रीय

July 19, 2025 10:57 AM July 19, 2025 10:57 AM

views 11

प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु- अमित शहा

देशातल्या प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. 21व्या जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात देशात खेळांना खूप महत्...

July 19, 2025 10:07 AM July 19, 2025 10:07 AM

views 10

पोलाद उद्योगाची भूमी असलेल्या पश्चिम बंगालचा प्रधानमंत्र्यांद्वारे गौरव

पश्चिम बंगालच्या भूमीनं अनेक महत्त्वाच्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत, ही भूमी प्रेरणादायी आहे. पोलाद उद्योगाची भूमी असलेला हा भूभाग एकेकाळी रोजगार निर्मितीचे केंद्र होतं अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी पश्चिम बंगालचा गौरव केला. पश्चिम बंगालमध्ये काल तेल, वायू, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रामधील पाच हजार...

July 19, 2025 9:19 AM July 19, 2025 9:19 AM

views 10

देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप या वर्षी तयार केली जाणार

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप या वर्षी तयार केली जाईल असं काल जाहीर केलं. हैदराबाद इथं केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या 85 व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते.   ते म्हणाले की, सरकारन सहा सेमीकंडक्टर प्लांट...

July 18, 2025 8:22 PM July 18, 2025 8:22 PM

views 4

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार झाले आहेत. सुरक्षादलांनी त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रायफली जप्त केल्या आहेत. अबुझमाड भागात दुपारी ही चकमक झाली. अजूनही काही माओवादी त्या भागात लपलेले असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरु आहे.   

July 18, 2025 8:13 PM July 18, 2025 8:13 PM

views 8

मुंबईत ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची बैठक

गोव्यात होणारा ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची पहिली बैठक आज मुंबईत झाली. बैठकीच्या अध्यक्षपदी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होते. सुकाणू समितीचा विस्तार करण्यात आला असून  सदस्यांची संख्या 16 वरून 31 करण्यात आली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे...

July 18, 2025 8:08 PM July 18, 2025 8:08 PM

views 13

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

घरात रोकड आढळल्याने वादग्रस्त ठरलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वर्मा यांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या त्रिसदस्यीय अंतर्गत समितीच्या निष्कर्षाला आव्हान देणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. या समितीने पूर्वग्रहावर आधारित चौकशी केली असून आपल्याला बाजू मांडण्याची प...

July 18, 2025 2:05 PM July 18, 2025 2:05 PM

views 20

पूर्व भारताच्या विकासाकरता बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशातली पूर्वेकडची राज्यं प्रगतीपथावर असून पूर्व भारताच्या विकासासाठी बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मोतिहारी इथं सात हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ...

July 18, 2025 2:09 PM July 18, 2025 2:09 PM

views 15

‘सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध’

मुंबई शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मुंबईच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात आज इंडियन इन्स्टिट्...

July 18, 2025 2:16 PM July 18, 2025 2:16 PM

views 17

पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार टीआरएफ गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याचं भारताकडून स्वागत

पहलगाम  दहशतवादी हल्ल्याला जबाबदार  द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यां...

July 18, 2025 1:07 PM July 18, 2025 1:07 PM

views 9

पहलगाम हल्ल्या मागे असलेला टीआरएफ गट अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित

पहलगाम इथं 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे असलेल्या द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेच्या सरकारनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं...