राष्ट्रीय

July 20, 2025 3:26 PM July 20, 2025 3:26 PM

views 6

जगातले सर्वात वयस्कर मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जगातले सर्वात वयस्कर मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांच्या पार्थिवावर आज पंजाबमधल्या त्यांच्या गावी बियास इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी यावेळी उपस्थित राहून फौजा सिंग यांना आदरांजली वाहिली. फौजा सिंग यांचं गेल्या मंगळवारी व...

July 20, 2025 3:31 PM July 20, 2025 3:31 PM

views 5

इंधन तेल खाणींचा शोध घेण्यासाठी १० लाख चौरस किमी समुद्री क्षेत्र खुलं !

सद्यस्थितीत दहा लाख चौरस किलोमीटर इतका सागरी प्रदेश तेल इंधनाच्या खाणींच्या शोधासाठी खुला केला असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. याबरोबरीनंच ९९ टक्के नो-गो क्षेत्र देखील अशा शोधासाठी खुलं केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ...

July 20, 2025 3:31 PM July 20, 2025 3:31 PM

views 7

मलेरिया प्रतिबंधक लस संशोधन प्रगतीपथावर

भारतीय औषध संशोधन परिषद आणि राष्ट्रीय प्रतिकारशक्तीशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ संयुक्तपणे मलेरिया प्रतिबंधक लस विकसित करत आहेत. या लशीचे नाव ऍडफॅल्सीवॅक्स असं असून सध्या तिच्या चाचणीदरम्यानचे निकाल आशादायक असून लवकरच ती सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संपूर्ण स्वदेशी सं...

July 20, 2025 2:54 PM July 20, 2025 2:54 PM

views 13

मुंबईत आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘सायक्लोथॉन’चं आयोजन

१६६व्या आयकर दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून मुंबईत आयकर विभागाने आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. अभिनेता जॉन अब्राहम, क्रिकेटपटू शिवम दुबे, ॲथलेटिक अंजु बॉबी जॉर्ज हे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ४००हून अधिक जणांना सहभाग घेतला होता. प...

July 20, 2025 2:57 PM July 20, 2025 2:57 PM

views 12

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं इंडिया आघाडीच्या नेत्यांची काल दूरस्थ पद्धतीनं बैठक झाली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इत्यादी पक्षांचे नेते यामध्ये सहभागी झाले हो...

July 20, 2025 3:02 PM July 20, 2025 3:02 PM

views 7

न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षांची संमती मिळवण्याचा प्रयत्न

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर, त्यांना पदावरून हटवण्यासाठीच्या महाभियोग प्रस्तावावर सर्व राजकीय पक्षांनी स्वाक्षरी करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबाबत आपण समन्वय साधत असून, वि...

July 20, 2025 1:06 PM July 20, 2025 1:06 PM

views 21

आज ‘बुद्धिबळ दिन’ !

जगभरात आज ‘बुद्धिबळ दिन’ साजरा होत आहे. याच दिवशी १९२४ साली जागतिक  बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती. बुद्धिबळाच्या खेळाचा वापर समावेशकता, प्रशिक्षण, सक्षमीकरण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्हावा या हेतूने महासंघाने हे वर्ष ‘सामाजिक भानासाठी बुद्धिबळ वर्ष’ म्हणून घोषित केलं असून या वर्षीचा विषय ‘प्...

July 20, 2025 2:55 PM July 20, 2025 2:55 PM

views 3

आज ‘आंतरराष्ट्रीय चंद्र दिन’ !

मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं त्या दिवसाच्या निमित्ताने आज आंतरराष्ट्रीय चंद्र दिन साजरा केला जात आहे. १९६९ मध्ये अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने अपोलो ११ मोहीम आखली होती. २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. या दिवसाच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेन...

July 19, 2025 8:22 PM July 19, 2025 8:22 PM

views 18

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून, उद्या सर्वपक्षीय बैठक

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता  सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या प...

July 19, 2025 8:43 PM July 19, 2025 8:43 PM

views 18

केरळात अतिशय जोरदार पाऊस, ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट

केरळात आज अतिशय जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने वर्तवला असून ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट दिला आहे. या ठिकाणी आज शाळांना सुट्टी दिली होती. कासारगोड आणि कन्नूरला उद्यासाठी देखील रेड ॲलर्ट दिला आहे.  वायनाडमधे गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे मुंदक्की चूरलमाला परिसरात...