राष्ट्रीय

July 22, 2025 1:17 PM July 22, 2025 1:17 PM

views 15

दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.   लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरु केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण या विषयांवर चर्चेच...

July 22, 2025 8:40 AM July 22, 2025 8:40 AM

views 7

प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

उपराष्ट्रपपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्याशी निगडीत कारणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आपल्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी केलेल्या सहकार्यासाठी...

July 21, 2025 8:15 PM July 21, 2025 8:15 PM

views 12

राजकीय भांडणात ईडी स्वतःचा वापर का करु देतेय, असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

राजकीय भांडणांसाठी ईडी स्वतःचा वापर का करु देते, असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी ईडीची याचिका आज फेटाळली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला एका प्रकरणात ईडीनं बजावलेलं समन्स कर्नाटक उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. याला आव्हा...

July 21, 2025 7:58 PM July 21, 2025 7:58 PM

views 9

समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरातप्रकरणी ईडीचे समन्स

विविध समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरात केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज अभिनेता प्रकाश राज, राणा दुग्गुबाती, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेकजणांना  चौकशीसाठी समन्स पाठवलं.     राणा दुग्गुबाती याला २३ जुलैला.प्रकाश राज यांना ३० जुलैला, विजय देवरकोंडाला  ६ ऑगस्टला तर ल...

July 21, 2025 7:40 PM July 21, 2025 7:40 PM

views 12

नागालँडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन

गेल्या काही दिवसांपासून नागालँडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन आणि  दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोहीमाम इथं काल फेसेमा ते किसामा -कीगवेमा या मार्गावर भूस्खलन झालं. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून याठिकाणच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे.  या मार्गाच्य...

July 20, 2025 7:59 PM July 20, 2025 7:59 PM

views 13

अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावरून निष्कर्ष काढणं योग्य नाही – मंत्री के. राम मोहन नायडू

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान अपघात तपास विभागाच्या प्राथमिक अहवालावरून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही असं मत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. गाझियाबाद इथल्या हिंडन विमानतळावरून देशातल्या १० प्रमुख शहरांसाठी थेट विमान सेवा आजपासून सुरू झाली. या क...

July 20, 2025 7:47 PM July 20, 2025 7:47 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते २१ ऑगस्टपर्यंत चालेल.  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवी दिल्लीत संसद भवन इथं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.    ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्य...

July 20, 2025 7:48 PM July 20, 2025 7:48 PM

views 5

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते मालदीवमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील. या भेटीत प्रधानमंत्री आणि मालदीवचे राष्ट्रपती मुइझ्झू  यांच्यात महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा होईल. त्यान...

July 20, 2025 7:33 PM July 20, 2025 7:33 PM

views 14

हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

हिमाचल प्रदेशात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा  प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक केंद्रीय समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. गृहमंत्रालयाच्या पत्रकात ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रुडकीची केंद्रीय इमारत संशोधन संस्था, पुण्याची भ...

July 20, 2025 7:30 PM July 20, 2025 7:30 PM

views 10

मेघालयात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दल प्रधानमंत्र्यांचा लेख

पर्यटन, युवा सक्षमीकरण, महिलांचे स्वयंसहाय्य्यता गट, पीएम सूर्यघर योजना आणि व्हायब्रण्ट व्हिलेज योजना या सारख्या उपक्रमांमुळे मेघालयात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी एक लेख समाजमाध्यमावर सामायिक केला आहे. शासकीय मदत आणि स्थानिक जनतेच्या सहभागामुळे मेघालय आपल्या उदाहरणातून सक्षम ...