राष्ट्रीय

August 23, 2025 10:07 AM

views 53

ऑनलाइन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक, २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

ऑनलाइन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक, 2025 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंजुरी दिली. हे विधेयक परवा लोकसभेत, तर काल राज्यसभेत मंजूर झालं होतं. ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे गेम...

August 23, 2025 9:59 AM

views 21

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. प्रधानमंत्री मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 29 आणि 30 ऑगस्ट हे दोन दिवस जपानला भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हा आठवा जपान दौरा असेल. तर जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या...

August 23, 2025 12:26 PM

views 39

संपूर्ण देशभर आज राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा

दूसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस आज संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 या दिवशी भारताच्या चंद्रयान-3 मिशनअंतर्गत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीत्या उतरवण्यात आलेल्या घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणं हा भारताच्या यशा...

August 22, 2025 1:33 PM

views 19

देशातल्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा

अरुणाचल प्रदेश, बिहार, पूर्व राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, उत्तराखंड, आणि मध्यप्रदेशात आज जोरदार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यांमध्येही येत्या २ ते ३ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ईशान्येकडच्या राज्या...

August 22, 2025 1:29 PM

views 23

भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानाची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल

भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानाची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल अशी माहिती इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. यामध्ये आतापर्यंत सुमारे ७ हजार ७०० चाचण्या घेण्यात आल्या असून पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत उर्वरित २...

August 22, 2025 8:40 PM

views 21

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर ३० दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर  ३१व्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे, परंतु सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. बि...

August 22, 2025 1:20 PM

views 53

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली एनसीआर परिसरातले रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांना वगळता उर्वरित कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यात यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही अं...

August 22, 2025 1:24 PM

views 18

जम्मूत विविध ठिकाणी ईडीचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जम्मूत विविध ठिकाणी छापे टाकले. यात प्रामुख्यानं भूमी कांड संबंधातल्या महसूल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा आणि कार्यालयांचा समावेश आहे. त्यात बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित असलेली कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त केले गेल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. कर च...

August 22, 2025 9:54 AM

views 21

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधल्या गया इथं ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसंच गया ते दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस गाडीलाही ते हिरवा झेंडा दाखवतील.  ६ हजार ८८० कोटींच्या ६६० मेगावॅट बक्सर औष्णिक विद्युत केंद्राचं उद्घाटनही प...

August 21, 2025 3:05 PM

views 33

संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. २१ जुलैला हे अधिवेशन सुरु झालं होतं. आज सकाळी ११ वाजता लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, बिहार मतदारयाद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरु झाला. त्यामुळे कामकाज १...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.