राष्ट्रीय

September 13, 2025 3:33 PM

views 5

कर्नाटकमधे गर्दीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू, १८ हून अधिक जण जखमी

कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात काल संध्याकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या गर्दीत एक मालवाहू ट्रक घुसून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. समोरुन येणाऱ्या दुचाकीला टाळताना हा अपघात झाला. या अपघातात चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.   प्र...

September 13, 2025 3:13 PM

views 36

बिहार विधानसभा निवडणुकीत नीतिश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकरता नीतीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असतील, असं उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की भाजपा आणि रालोआ चा नीतिशकुमार यांच्यावर पूर्ण विश्वास असून त्यांच्या नेतृत्व...

September 13, 2025 3:06 PM

views 14

पाचवी जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद भारतात होणार

पाचवी जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे. इटलीत रोम इथं झालेल्या चौथ्या जागतिक तटरक्षक दल शिखर परिषदेत काल ही घोषणा झाल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं समाज माध्यमांवरून दिली आहे. २०२७ साली भारतात चेन्नई इथं या परिषदेच्या पाचव्या आवृत्तीचं आयोजन केलं जाईल. या परिषदेचं भारताला...

September 13, 2025 2:59 PM

views 24

ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि ईशान्येकडची राज्ये देशाच्या विकासाचं इंजिन बनत आहेत. सरकारचं अॅक्ट इस्ट धोरण आणि ईशान्येच्या आर्थिक कॉरिडॉर योजनेत मिझोरामचं महत्त्वाचं योगदान आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मिझोरामची राजधानी आयझॉल इथल्या नऊ हजार...

September 12, 2025 9:07 PM

views 51

ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल-प्रधानमंत्री

ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा  आवाज बनेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.  ते आज “भारताच्या ज्ञानपरंपरेचा हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून पुनर्शोध" या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय परिषदेचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते. ही परिषद काल सुर...

September 12, 2025 9:04 PM

views 30

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला १० लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

एन पी सी आय नं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या युपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या १५ तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून, किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यांसारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत ...

September 12, 2025 2:58 PM

views 24

सिक्कीममध्ये दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू

सिक्कीममध्ये काल रात्री गेझिंग जिल्ह्यात रिंबिक गावात दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर एक जण बेपत्ता झाला असून अन्य एक जखमी झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा समावेश आहे.

September 12, 2025 2:53 PM

views 27

लखनऊ इथं बस उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात लखनऊ इथं काकोरी भागात बस उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून १०पेक्षा अधिक जण जखमी झाले. काल रात्री हरदोईवरून येणारी बस काकोरी भागात पाण्याच्या टँकरला धडकली आणि रस्त्याशेजारच्या २० फूट खोल खड्ड्यात पडली, आणि हा अपघात झाला.

September 12, 2025 2:02 PM

views 25

छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ माओवादी ठार

छत्तीसगढमध्ये आज सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेवेळी माओवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत दोन माओव...

September 12, 2025 2:45 PM

views 39

जीएसटी सुधारणांमुळे टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार

वाहन क्षेत्रातल्या जीएसटी सुधारणांमुळे त्यातल्या टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार आहे. या नव्या सुधारणांनुसार ३५०सीसी पर्यंतच्या बाईक्स, बसेस, चारचाकी गाड्या, १८०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेचे ट्रॅक्टर आणि विविध सुट्या भागांच्या किंमतीत घट होणार आहे. ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.