राष्ट्रीय

September 16, 2025 8:18 PM

views 40

Seva Pakhwada : आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर उर्जा क्षेत्रात महत्त्वाचं स्थान

सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. हरित आणि स्वच्छ उर्जेच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर उर्जा क्षेत्रात महत्त्वाचं स्थान मिळण्यासाठी केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा…   हवामान ब...

September 16, 2025 3:59 PM

views 64

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला उद्यापासून सुरुवात

स्वच्छताही सेवा या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरं होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्याचं ...

September 16, 2025 3:44 PM

views 306

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उद्यापासून सुरूवात

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला उद्यापासून सुरूवात होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथं या अभियानाची सुरूवात होणार आहे. तसंच मुंबईत यशवंतराव चव्‍हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या अभियान...

September 16, 2025 3:28 PM

views 4

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधे पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तराखंडमध्ये देहरादून इथे सहस्त्रधारा भागात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य करून १०० जणांना सुरक्षितपणे वाचवलं. संततधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात रस्ते आणि पुलांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बाधित जिल्...

September 16, 2025 3:26 PM

views 29

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. रामगुलाम आज राष्ट्रपतींची भेट घेणार

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना भेटून त्यांनी चर्चा केली.  आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रामगुलाम तिरुपती भेटीनंतर नवी दिल्लीत पोहोचले आहेत. आज सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रप...

September 16, 2025 3:06 PM

views 43

Seva Pakhwada : हवामान बदल आणि पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी

सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. हवामान बदल आणि पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर  केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा…   जागतिक स्तरावर भारताने नेहमीच पर्यावरण रक्षणाची भूमिका घेतली आह...

September 16, 2025 2:55 PM

views 48

उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी विविध सामग्रीवर करकपात

वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. यात नवीन आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे.    केंद्र सरकारच्या स्वच्छ उर्जा उत्पादन धोरणाला आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक उर्जास्रोतांच्या वापराला चालन...

September 16, 2025 2:59 PM

views 31

सुरक्षित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं गरजेचं-गृहमंत्री

२०४७ पर्यंत विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं आहे, असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी कृतिदल प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज नवी द...

September 16, 2025 1:38 PM

views 25

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी एक दिवस मुदतवाढ

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं २०२५-२६ या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत प्रप्तिकरविवरण पत्र भरता येतील. यंदाच्या करनिर्धारण वर्षासाठी  आतापर्यंत सात कोटीहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाल्याचं कर विभागानं सांगितलं आहे.

September 15, 2025 8:49 PM

views 7

ऑगस्टमध्ये पुरुषांच्या बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यापर्यंत कमी

यंदा ऑगस्टमध्ये वय वर्षं १५ आणि त्यावरील पुरुषांमधल्या बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. नियमित सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये ग्रामीण भागातल्या पुरुषांच्या बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. जूनमध्ये एकूण कामगारांमध्ये महिलांमध्ये कामगारांचं प्रमाण ३० टक्के इतकं नोंदवण्यात आलं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.