August 23, 2025 1:36 PM August 23, 2025 1:36 PM
8
भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी सुरु- डॉ. एस जयशंकर
भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. देशातले शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.