राष्ट्रीय

August 24, 2025 1:42 PM August 24, 2025 1:42 PM

views 3

गगनयान या तराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार- संरक्षणमंत्री

गगनयान या पहिल्यावहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार असून ही फक्त तंत्रज्ञानातली प्रगती नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय आहे, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला.   मोहिमेसाठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन्स शुभांशू शुक्ला, प्रशांत बालकृष्ण...

August 24, 2025 1:33 PM August 24, 2025 1:33 PM

views 1

सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल एका माध्यमसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. देशात महागाई नियंत्रणात आहे, व्याजदर कमी आहेत तसंच परकीय चलनसाठ्याची स्थिती मजबूत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.   ...

August 24, 2025 1:28 PM August 24, 2025 1:28 PM

views 1

एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

डीआरडीओ अर्थात  संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल  दुपारी साडेबारा वाजता ओदिशा किनाऱ्याजवळ आय ए डी डब्लू एस अर्थात   एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली.    या बहुस्तरीय  स्वदेशी शस्त्र  प्रणालीमध्ये जमिनीतून आकाशात मारा  करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, कमी पल्...

August 24, 2025 1:19 PM August 24, 2025 1:19 PM

views 1

पंजाबमधल्या १ कोटी ४१ लाख गरीब लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळत राहणार

पंजाबमधल्या १ कोटी ४१ लाख गरीब लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य मिळत राहणार असल्याचं केंद्रीय खाद्यान्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.    यांनी केंद्र सरकार पंजाबातल्या ५५ लाख गरीब नागरिकांना मोफत धान्य देणं बंद करणार असल्याच्या काल केलेल्या आरोपाला...

August 24, 2025 1:11 PM August 24, 2025 1:11 PM

views 1

येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटीची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार

येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकी दरम्यान जीएसटीशी संबंधित घेण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे.

August 24, 2025 10:08 AM August 24, 2025 10:08 AM

views 5

अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल  शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे.  काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मोदी म्हणाले की, भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला असल्याचं सांगताना मोदी यांनी भारत क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रो...

August 23, 2025 8:06 PM August 23, 2025 8:06 PM

views 1

अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आर्यभट्ट गॅलरीचं उद्घाटन

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज नवी दिल्ली इथल्या नेहरू तारांगणात आर्यभट्ट राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, आर्यभट्ट गॅलरीचं  उद्घाटन केलं. देशाच्या युवा पिढीला उत्सुकता जोपासण्यासाठी आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. देशाची स...

August 23, 2025 8:15 PM August 23, 2025 8:15 PM

views 57

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली. २९ महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.    बृहन्मुंबई महानगरपालिकेत यात निवडणुकीसाठी २२७ प्रभाग असतील. नवी मुंबई महानगरपालिकेत २८ प्रभाग असून यात २७ प्रभाग चार सदस्यीय अ...

August 23, 2025 3:03 PM August 23, 2025 3:03 PM

views 9

लवकरच गगनयान अंतराळात झेपावणार- प्रधानमंत्री

गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केलं. गेल्या काही काळांत अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरवपू...

August 23, 2025 2:16 PM August 23, 2025 2:16 PM

views 5

कोणत्याही देशाबरोबर वाटाघाटी करताना राष्ट्रीय हिताला पहिलं प्राधान्य दिलं जाईल- पियुष गोयल

कोणत्याही देशाबरोबर मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी करताना, राष्ट्रीय हित आणि भारतीय उद्योगांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.   भारत युरोपीय संघाच्या नियमितपणे संपर्कात असून...