राष्ट्रीय

September 11, 2025 1:28 PM September 11, 2025 1:28 PM

views 9

कुख्यात गुन्हेगार मुनवर खानला कुवेतहून भारतात परत आणण्यात सीबीआयला यश

फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार मुनवर खान याला कुवेतहून भारतात परत आणण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे.    यात इंटरपोल, एनसीबी कुवेत आणि एमईएचं सहकार्य मिळाल्याचं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं म्हटलं आहे. कुवेत पोलिसांनी मुनवर खानला आज हैदराब...

September 11, 2025 1:15 PM September 11, 2025 1:15 PM

views 4

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. गांधीवादी विचारसरणीचे विनोबा भावे यांनी आपलं संपूर्ण जीवन उपेक्षितांच्या कल्याणासाठी समर्पित केलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावर त्यांना अभिवादन केलं आहे.   स्वामी विवेक...

September 10, 2025 8:36 PM September 10, 2025 8:36 PM

views 15

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार विषयक चर्चेतून विलक्षण संधीचं दार उघडलं जाणार आहे.   दोन्ही देशांची शिष्टमंडळं या क्षेत्रात परस्पर सहमतीच्या जवळ पोहोचण्यासाठी काम करत आहेत, अस...

September 10, 2025 4:02 PM September 10, 2025 4:02 PM

views 2

नौदलाच्या जवानाची दिशाभूल केल्या प्रकरणी २ भावांना अटक

नौदलाच्या जवानाची दिशाभूल करुन त्यांची बंदूक आणि काडतूस पळवून नेल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. तेलंगाणातल्या असिफाबादमधून ही अटक करण्यात आली.   दोघांपैकी एक जण अग्नीवीर आहे. शनिवारी रात्री दोघांपैकी एकानं कर्तव्यावर असणाऱ्या जवानाची दिशाभूल करुन त्याची बंदूक आणि काडतूस घे...

September 10, 2025 3:14 PM September 10, 2025 3:14 PM

views 6

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन देण्यावर बंदी

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. राज्यातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल.  ...

September 10, 2025 3:06 PM September 10, 2025 3:06 PM

views 3

भारताचा विकास दर यंदा साडेसहा टक्क्याऐवजी ६.९ दशांश टक्के – FITCH

फिच या जागतिक पतमापन संस्थेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दराचा अंदाज साडेसहा टक्क्यावरून वाढवून ६ पूर्णांक ९ दशांश टक्के केला आहे. देशांतर्गत मागणी, वाढता ग्राहक खर्च आणि त्याला पूरक आर्थिक परिस्थिती, यांमुळे आधीच्या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.   भारताने...

September 10, 2025 2:57 PM September 10, 2025 2:57 PM

views 19

पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील 4 ते 4 दिवस मुसळधार पाऊस

पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम इथंही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात तसंच छत्तीसगड, बिहार आणि ओदिशा इथं आज आणि पुढच्या तीन ते चार दि...

September 10, 2025 2:54 PM September 10, 2025 2:54 PM

views 32

मुसळधार पाऊसामुळे माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद

जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पाऊस आणि सततच्या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे.  रियासी जिल्ह्यात २६ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसाने जागोजागी दरडी कोसळल्या असून जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही काही ठिकाणी बं...

September 10, 2025 2:51 PM September 10, 2025 2:51 PM

views 10

वितरण व्यासपीठांना मासिक, तिमाही कामगिरी अहवाल देण्याचे निर्देश : TRAI

ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं सर्व वितरण व्यासपीठांना आपल्या कार्याचा मासिक किंवा त्रैमासिक अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश देशातल्या सर्व डीटीएच, हेडेड इन स्काय, मल्टी सिस्टीम ऑपरेटर आणि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हीजन ऑपरेटरना लागू होणार आहेत.   दूरसंचार मंत्रालयानं जारी...

September 10, 2025 2:44 PM September 10, 2025 2:44 PM

views 13

झारखंडमधे आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक

झारखंडच्या दहशतवाद विरोधी दलाच्या पथकाने आज आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला रांची इथून अटक केली. त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. या संशयित दहशतवाद्याची ओळख पटली असून तो मूळचा बोकारो जिल्ह्यातल्या पेटारवार इथला आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.