राष्ट्रीय

September 20, 2025 8:24 PM September 20, 2025 8:24 PM

views 33

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या मुंबई क्रुझ टर्मिनलचं लोकार्पण

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे २०४७पर्यंत विकसित व्हायचे असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गुजरातमधल्या भावनगरमध्ये समुद्र से समृद्धी तक या कार्यक्रमात ते बोलत होते.    यावेळी त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्य...

September 20, 2025 8:17 PM September 20, 2025 8:17 PM

views 16

जीएसटी करातले बदल देशातल्या नागरिकांना फायद्याचे ठरावे म्हणून केले आहेत-अर्थमंत्री

वस्तू आणि सेवा करातले बदल देशातल्या नागरिकांना फायद्याचे ठरावे म्हणून केले आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तमिळनाडूत तुतिकोरिन इथं काडेपेटी आणि फटाके उत्पादक संघटनेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. या क्षेत्राला आवश्यक पाठबळ देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं...

September 20, 2025 8:21 PM September 20, 2025 8:21 PM

views 145

जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना २०२३ या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मल्याळी जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीवरुन केंद्र सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.   प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या मोहनलाल यांची कारकिर्द अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे...

September 20, 2025 7:36 PM September 20, 2025 7:36 PM

views 21

वैद्यकीय खर्चासाठी उपयुक्त ठरणारा आरोग्य विमा आणि आयुर्विमा संरक्षण क्षेत्रातही नवनवीन योजना

 सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय खर्चासाठी उपयुक्त ठरणारा आरोग्य विमा आणि आयुर्विमा संरक्षण क्षेत्रातही नवनवीन योजना आणल्या आहेत.   आकस्मिक संकटांमुळे असु...

September 20, 2025 7:36 PM September 20, 2025 7:36 PM

views 40

जीएसटीचे येत्या सोमवारपासून नवे दर लागू होणार

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने कर संरचना सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सुधारणा केल्या आहेत. येत्या सोमवारपासून नवे दर लागू होणार आहेत. या नवीन कररचनेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तुंवरचा जीएसटी कमी करून केंद्र स...

September 20, 2025 3:38 PM September 20, 2025 3:38 PM

views 16

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत स्वच्छता मोहीम

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ च्या निमित्ताने खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत मुंबईत जुहू आणि वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जुहू चौपाटीवरच्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली. मोहिमेच्या वेळी उपस्थितांना स्व...

September 20, 2025 3:31 PM September 20, 2025 3:31 PM

views 27

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. शासकीय अधिकाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी न्यायाधीकरण महत्त्वाचं असल्याचं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीक...

September 20, 2025 3:22 PM September 20, 2025 3:22 PM

views 41

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता मोहीम

जागतिक किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या उपक्रमांतर्गत आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, विविध शाळांचे विद्यार्थी आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.   प्लास्टिक पिशव्या टाळण्याचा संदेश देणाऱ्या क...

September 20, 2025 2:50 PM September 20, 2025 2:50 PM

views 30

आयुष्मान भारत मिशनमुळे ८० कोटी आरोग्य खाती तयार

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल परिसंस्थेला मजबूत केलं असून त्यामुळे आरोग्य सेवेचे लाभ अधिक सुलभतेने मिळत आहेत.   भारताच्या आरोग्य सेवेत डिज...

September 20, 2025 2:42 PM September 20, 2025 2:42 PM

views 52

रुपयाचं मूल्य वाढवण्याचं मोठं ध्येय – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा

रुपयाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मूल्य वाढवण्याचं खूप मोठं ध्येय देशासमोर असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. ते काल मुंबईत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.   क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भारतीय रुपया आणि ड...