राष्ट्रीय

September 23, 2025 1:13 PM September 23, 2025 1:13 PM

views 19

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात देशभरातले दीड कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी

स्वच्छतेचं महत्त्व सर्वांच्या मनावर ठसवण्यासाठी सुरु झालेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानात आत्तापर्यंत देशभरातले दीड कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले आहेत. केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या अभियानांतर्गत आत्तापर्यंत देशात ११ लाखापेक्षा जास्त ठिकाणं ठरवून दिली असून यापैकी...

September 23, 2025 9:20 AM September 23, 2025 9:20 AM

views 17

छत्तीसगडमध्ये दोन माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये, नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. दोघांवरही प्रत्येकी चाळीस लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात केलेली ही कारवाई हा मोठा विजय असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

September 23, 2025 9:02 AM September 23, 2025 9:02 AM

views 16

खुशखबर! 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिंलेंडर देण्याचा सरकारचा निर्णय

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची भेट म्हणून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिंलेंडर जोडणी देणार आहे. या आर्थिक वर्षात लाभार्थींना मिळणारी ही भेट महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नाला अधिक मजबूत करेल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे 10 कोटी 6...

September 23, 2025 1:39 PM September 23, 2025 1:39 PM

views 13

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार आहेत. मल्याळी चित्रपट अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना जवान या चित्रपटासाठी तर विक्रांत मेस्सी यांना 12वी फेल या चित्रपटासा...

September 23, 2025 2:45 PM September 23, 2025 2:45 PM

views 29

आज, १०वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस

दहावा राष्ट्रीय आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. ‘आयुर्वेद प्रत्येकासाठी; आयुर्वेद पृथ्वीसाठी’ अशी यावर्षीची संकल्पना आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयुर्वेद दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम गोव्यात होणार असून त्याचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्र...

September 22, 2025 8:36 PM September 22, 2025 8:36 PM

views 60

वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून झाले. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…   जीएसटी दरांतल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ...

September 22, 2025 2:36 PM September 22, 2025 2:36 PM

views 13

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या अपघातासाठी वैमानिक जबाबदार असल्याचं SC चं निरिक्षण

अहमदाबाद इथे गेल्या १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातासाठी वैमानिक जबाबदार असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. तसंच, या प्रकरणाची स्वतंत्र, निःपक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना नोटीस बजावली...

September 22, 2025 3:24 PM September 22, 2025 3:24 PM

views 13

अरुणाचल प्रदेशात विविध विकासप्रकल्पांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

व्हायब्रन्ट व्हीलेज उपक्रमाच्या यशामुळे सामान्य जनतेचं आयुष्य सुलभ झालं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर इथं सुमारे ५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करण्यात आली , त्या वेळी ते ब...

September 22, 2025 1:32 PM September 22, 2025 1:32 PM

views 12

आसाममध्ये बोडोलँड प्रदेशातल्या ४० सदस्यीय कौन्सिलच्या निवडीसाठी मतदान

आसाममधे बोडोलँड प्रदेशातल्या चाळीस सदस्यीय कौन्सिलच्या निवडीसाठी आज मतदान सुरू आहे. या प्रदेशात कोकराझार, बक्सा, चिरांग, उदलगुरी आणि तमुलपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरुवात झाली, दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणुकीत ३१६ उमेदवार असून २६ लाख मतदान मतदानाचा ह...

September 22, 2025 1:23 PM September 22, 2025 1:23 PM

views 17

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतली फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

अमेरिकेत न्यूयॉर्क इथं होणाऱ्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ऐंशीव्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्री थेरेसा लाझारो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्र आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. फिलिपिनचे अध्य...