मिश्र

July 30, 2024 10:08 AM July 30, 2024 10:08 AM

views 12

अमरनाथ यात्रेसाठी आणखी एक तुकडी जम्मू-काश्मीरमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी 1477 यात्रेकरूंची आणखी एक तुकडी आज पहाटे जम्मू-काश्मीरमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून रवाना झाली. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास 52 वाहनांमधून रवाना झालेल्या तुकडीत 1142 पुरुष, 254 महिला, तीन मुलं, 66 साधू आणि 12 साध्वींचा समावेश आहे.

July 27, 2024 3:02 PM July 27, 2024 3:02 PM

views 7

जम्मू-काश्मीरमधल्या बेसकॅम्पमधून आज १ हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना

जम्मू-काश्मीरमधल्या भगवती नगर यात्री निवास इथल्या बेसकॅम्पमधून आज एक हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना झाले. यात्रेकरूंना घेऊन जाणारी ६३ वाहने पहाटे पवित्र गुफेच्या दिशेने रवाना झाली. यातले ७७२ यात्रेकरू बाल्ताल मार्गाने तर ९९९ यात्रेकरू पहलगाम मार्गाने पुढचा प्रवास करतील.

July 27, 2024 1:24 PM July 27, 2024 1:24 PM

views 15

जम्मू आणि काश्मीर चकमकीत 1 पाकिस्तानी नागरिक ठार, सुरक्षा दलाचे 5 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मच्चाल सेक्टरमधल्या कामकारी भागात आज सकाळी सुरू झालेल्या चकमकीत एका पाकिस्तानी नागरिकाला ठार करण्यात आलं असून या चकमकीत सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. या भागात अद्यापही चकमक सुरू आहे.

July 24, 2024 7:15 PM July 24, 2024 7:15 PM

views 9

दक्षिण महाराष्ट्र,कोकण,आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती

हवामान खात्यानं आज पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दक्षिण महाराष्ट्र, कोकण, आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.   कोल्हापूर जि...

July 22, 2024 8:01 PM July 22, 2024 8:01 PM

views 7

मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज पौड न्यायालयानं सुनावली आहे. त्या वादग्रस्त आयएएस प्रशिक्षण अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. पुणे पोलीसांनी मनोरमा यांच्या बंगल्यातून पिस्तूल आणि पिस्तुलातल्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत. यापू...

July 22, 2024 2:49 PM July 22, 2024 2:49 PM

views 10

मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी करत राबवली शोधमोहीम

मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये आज पोलिसांनी छापेमारी करत शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत विविध कलमांतर्गत ४७ जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आह...

July 19, 2024 2:50 PM July 19, 2024 2:50 PM

views 12

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचा ८१ हजार ५८८ अंकांचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज सुरुवातीच्या सत्रात ८१ हजार ५८८ अंकांचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला, मात्र जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर तो १६७ अंकांनी घसरला आणि ८१ हजार १७७ अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं देखील सुरुवातीच्या सत्रात २४ हजार ८५५ अंकांचा नवा उच...

July 18, 2024 2:35 PM July 18, 2024 2:35 PM

views 11

जम्मू-काश्मीरमधल्या डोडा येथे झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जद्दन बटा गावात शोध मोहिमेसाठी उभारलेल्या लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. सुमारे एक तास झालेल्या या चकमकीत जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्...

July 16, 2024 8:11 PM July 16, 2024 8:11 PM

views 6

पुढचे पाच दिवस मध्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार पावसाची शक्यता

पुढचे पाच दिवस गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.    तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि तामिळनाडू इथंही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं...

July 16, 2024 7:47 PM July 16, 2024 7:47 PM

views 13

केरळमध्ये चित्तूर नदीत अडकलेल्या चार जणांची सुटका

केरळमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आज चित्तूर नदीत अडकलेल्या चार जणांची सुटका केली. पल्लकड जिल्ह्यात चित्तूर नदीत चार जण आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, तामिळनाडूच्या आलियार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे पाण्याची पातळी वाढून ते नदीतल्या खडकावर अडकले. अग्निशमन दलाने दोरी आणि ज...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.