मिश्र

October 3, 2024 7:57 PM October 3, 2024 7:57 PM

views 7

तुरुंगात कैद्यांना जातीच्या आधारे कामं देण्याच्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

कारागृह नियमावलीमधल्या तरतुदींपैकी, कैद्यांना दिल्या जाणाऱ्या कामांची जातींच्या आधारे वर्गवारी करण्याची आणि जातीच्याच आधारे कामं देण्याच्या भेदभावपूर्ण तरतुदी सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवल्या आहेत. या तरतुदींविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. ...

October 3, 2024 3:06 PM October 3, 2024 3:06 PM

views 8

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

तूळजापूरहून गोणेवाडी इथं देवीची ज्योत घेवून जाणारं चारचाकी वाहन सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती इथं उलटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसंच पाच जण जख्मी झाले आहेत. घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. जखमींना नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे...

October 3, 2024 3:03 PM October 3, 2024 3:03 PM

views 4

नांदेड जिल्ह्यात सुमारे १४ क्विंटल गांजा जप्त

नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या शिवणी बामणी, डोंगरगाव आणि दिग्रस शिवारात छापा टाकून पोलिसांनी ६७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा सुमारे १४ क्विंटल गांजा जप्त केला आहे. या भागात गांजाची लागवड अवैधपणे केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना ही कारवाई केली. या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कायद्यांअंतर्गत...

October 2, 2024 7:30 PM October 2, 2024 7:30 PM

views 5

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

पुण्यात बावधन इथं आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालं होतं. बावधन परिसरातून आज सकाळी पावणे सात वाजता हेलिकॉप्टरने धुके असताना देखील उड्डाण केलं, त्यानंतर हा अपघात ...

October 1, 2024 2:55 PM October 1, 2024 2:55 PM

views 4

आयआयटी धनबाद इथं प्रवेश नाकारला गेलेल्या दलित विद्यार्थ्याला याच संस्थेत प्रवेश देण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिले निर्देश

आयआयटी धनबाद इथं प्रवेश शुल्क भरायला काही मिनिटं उशीर झाला म्हणून प्रवेश नाकारला गेलेल्या दलित विद्यार्थ्याला याच संस्थेत प्रवेश देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश...

October 1, 2024 3:29 PM October 1, 2024 3:29 PM

views 3

अभिनेते गोविंदा यांचा मुंबई इथल्या निवासस्थानी अपघात

ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांचा आज पहाटे मुंबई इथल्या निवासस्थानी अपघात झाला. परवाना असलेली रिव्हॉल्वर आपल्या कपाटात ठेवताना गोविंदा यांच्या हातून निसटली आणि त्यातून गोळीबार झाला. ही गोळी गोविंदा यांच्या पायाला लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यां...

October 1, 2024 2:39 PM October 1, 2024 2:39 PM

views 5

तरुणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हर घर दुर्गा हे अभियान मोलाची भूमिका बजावेल; लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी तरुणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हर घर दुर्गा हे अभियान मोलाची भूमिका बजावेल; असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल मुंबईत व्यक्त केला. कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा या अभियानाची सुरुवात बिर्ला यांच्या उपस्थितीत करण्यात...

September 28, 2024 8:39 PM September 28, 2024 8:39 PM

views 12

हरियाणामधल्या सोनीपतमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे तीन जणांचा मृत्यू

हरियाणामधल्या सोनीपतमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे परिसरातल्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहराने सांगितलं आहे.

September 27, 2024 7:18 PM September 27, 2024 7:18 PM

views 5

माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज पहाटे धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   रोहिदास पाटील यांनी सन १९७२ मध्ये धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून येत राजका...

September 27, 2024 12:55 PM September 27, 2024 12:55 PM

views 11

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, झारखंड आणि बिहारमध्ये आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून उत्तराखंड, पूर्वांचल तसंच हिमाचल प्रदेशात अतिमुसळधार प...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.