मिश्र

October 9, 2024 11:05 AM October 9, 2024 11:05 AM

views 8

श्री तुळजाभवानी देवीची आज शेषशायी अलंकार महापूजा बांधण्यात येणार

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची आज शेषशायी अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे. पाचव्या माळेपासून श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार रुपातील पूजा मांडण्यात येते. काल सहाव्या माळेला देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.

October 9, 2024 9:52 AM October 9, 2024 9:52 AM

views 8

अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू , दोन गंभीर जखमी

नांदेड शहरासह जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कंधार तालुक्यात मसलगा इथं एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. छत्रपती संभाजीनगर परिसरात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात लातूर, नांदेड, जालना आणि बीड शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच...

October 8, 2024 3:12 PM October 8, 2024 3:12 PM

views 8

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पोहोचला उच्चांकी पातळीवर

मागच्या काही दिवसांच्या पडझडीनंतर आज दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी उच्चांकी पातळीवर पोहोचले. सेन्सेक्स ३६६ अंकांनी वाढून ८१ हजार ४१६ अंकावर पोहोचला. तर निफ्टी १३१ अंकानी वाढून २४ हजार ९२७ अंकावर पोहोचला.

October 8, 2024 3:05 PM October 8, 2024 3:05 PM

views 9

ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षिका आणि लेखिका नीला उपाध्ये यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षिका आणि लेखिका नीला उपाध्ये यांचं काल रात्री मुंबईत चेंबुर इथं निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. चेंबुरच्या चरई विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

October 8, 2024 3:02 PM October 8, 2024 3:02 PM

views 10

दार्जिलिंगच्या पद्मजा नायडू यांची वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूस अँड ॲक्वेरियम्स संवर्धन पुरस्कार २०२४ साठी अंतिम स्पर्धक म्हणून निवड

दार्जिलिंगच्या पद्मजा नायडू यांची हिमालयन झूलॉजिकल पार्कच्या रेड पांडा कार्यक्रमाची वाझा, अर्थात वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूस अँड ॲक्वेरियम्स संवर्धन पुरस्कार २०२४ साठी अंतिम स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानानं विविध संस्थांच्या सहकार्यानं अनेक पुनर्वसन उपक्रम हाती घेतले हो...

October 8, 2024 9:23 AM October 8, 2024 9:23 AM

views 12

राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील, पुसद-वाशिम मार्गावरील मारवाडी फाट्याजवळ काल सकाळी प्रवासी गाडीला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण माहूरगड इथल्या देवीचं दर्शन घेऊन वाशिमकडे येत होते. दूसरा अपघात...

October 5, 2024 8:44 PM October 5, 2024 8:44 PM

views 4

एनआयएचे महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीत २२ ठिकाणी छापे

राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंधित प्रकरणात एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेनं आज महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीत २२ ठिकाणी छापे टाकले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारवायांशी संबंध असल्याच्या संदर्भात ही छापेमारी सुरु आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगाव...

October 5, 2024 9:08 PM October 5, 2024 9:08 PM

views 15

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यातून आज मान्सून परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उर्वरीत महाराष्ट्रातून पुढच्या आठवड्यात मान्सून पूर्णपणे माघारी जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

October 4, 2024 3:17 PM October 4, 2024 3:17 PM

views 12

मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून समाधान व्यक्त

मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्याखेरीज राष्ट्रीय तेलबिया आणि खाद्यतेल अभियान, चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यला मंजुरी इत्यादी निर्णयांबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त क...

October 3, 2024 8:33 PM October 3, 2024 8:33 PM

views 12

नवी दिल्लीत वेटलँड्स फॉर लाइफ या विषयावर आयोजित परिषदेचं उद्घाटन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पर्यावरण आणि वन्यजीव मंचातर्फे वेटलँड्स फॉर लाइफ या विषयावर आयोजित एका परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीतल्या पर्यावरण भवन इथं झालं. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात  पाणथळ जागा परिसंस्था जागरूकता आणि संवर्धन यावर प्रामुख्यानं भर दिला जाणार आहे.