मिश्र

November 10, 2024 10:40 AM November 10, 2024 10:40 AM

views 19

आज सर्वत्र हवामान कोरडं राहील, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात काल सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं 14 पूर्णांक 7 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि किमान तापमान सरासरीच्या आसपास असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

November 9, 2024 2:03 PM November 9, 2024 2:03 PM

views 10

आग्रा-लखनौ महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जण ठार

उत्तर प्रदेशमध्ये फिरोझाबाद जिल्ह्यात आग्रा-लखनौ महामार्गाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनाला एका बसगाडीनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. ही बस मथुरेहून लखनौला जात होती. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

November 9, 2024 1:58 PM November 9, 2024 1:58 PM

views 9

बँकॅाकहून आलेल्या २ प्रवाशांकडून गांजा जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी काल बँकॅाकहून आलेल्या २ प्रवाशांकडून गांजा जप्त केला आहे. सुमारे १५ किलो गांजाची किमत अंदाजे १५ कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

November 9, 2024 11:25 AM November 9, 2024 11:25 AM

views 10

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाला नवी दिल्लीत सुरूवात

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झालं. जागतिक आणि भारतीय थिंक टँक, व्यावसायिक, सरकारी आणि खासगी क्षेत्रे, स्वयंसेवी संस्था आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्रित आणून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्करी वार...

November 9, 2024 10:55 AM November 9, 2024 10:55 AM

views 3

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास प्रारंभ

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास कालपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीचे चरणस्पर्श करुन थोडी वर सरकत लुप्त झाली. हा अनोखा सोहळा सूर्यास्तापूर्वी काही क्षण अनुभवता येतो. सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी छातीवर...

November 9, 2024 10:34 AM November 9, 2024 10:34 AM

views 13

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी राहणार बंद

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या २० तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

November 9, 2024 10:14 AM November 9, 2024 10:14 AM

views 13

चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार

बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद ...

November 8, 2024 11:06 AM November 8, 2024 11:06 AM

views 11

काश्मिरच्या सोपोर भागात हशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

जम्मू आणि काश्मिरच्या सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. लष्कराकडून आलेल्या अधिकृत बातमीनुसार, सोपोरच्या पाणिपोरा परिसरात दहशतवाद्याचा गट लपला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर झालेल्या संयुक्त शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. गेल्या अठ्ठेचाळीस तासात, दोन दहशतवाद्यांना...

November 8, 2024 10:46 AM November 8, 2024 10:46 AM

views 6

ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांची जम्मू आणि काश्मिरंमध्ये हत्या

जम्मू आणि काश्मिर खोऱ्यातल्या किश्तवर जिल्ह्यात काल ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांचं दहशतवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेऊन हत्या केली. नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावं आहेत.   जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी हत्येच...

November 6, 2024 1:48 PM November 6, 2024 1:48 PM

views 4

मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात १० जंगली हत्तींचा मृत्यू

मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात १० जंगली हत्तींचा मृत्यू झाला होता. हत्तींनी मोठ्या प्रमाणात खराब झालेली कोडो वनस्पती खाल्ल्यानं त्यांचा मृत्यु झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. नमुन्यांमध्ये सायक्लोपियाझोनिक आम्ल आढळून आलं असल्याचं वनसंरक्षक अधिकार्‍यांनी सांगितलं.