मिश्र

November 7, 2025 2:28 PM November 7, 2025 2:28 PM

views 48

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वंदे मातरम्‌’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन केलं. ‘वंदे मातरम्‌’ हा एक मंत्र ...

November 7, 2025 2:17 PM November 7, 2025 2:17 PM

views 81

शाळा-रुग्णालयांवर भटके कुत्रे येऊ नयेत, स्थानिक संस्था जबाबदार – सर्वोच्च न्यायालय

सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, सार्वजनिक क्रीडा संकुलं, बसस्थानकं, रेल्वेस्थानकं इत्यादी ठिकाणी भटकी कुत्री येऊ नयेत, यासाठी व्यवस्थित कुंपण घालण्यात यावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. भटके कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही बाब काळजी करण्यासारखी असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती वि...

November 7, 2025 2:09 PM November 7, 2025 2:09 PM

views 41

कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी तहसीलदार निलंबित, पार्थ पवार यांच्यावर आरोप

पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.   या कथ...

November 7, 2025 2:06 PM November 7, 2025 2:06 PM

views 18

भारत-अमेरिका भागीदारी दृढ करण्यासाठी राजदूत क्वात्रा आणि अमेरिकी मंत्री पॉल कपूर यांची बैठक

भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय क्वात्रा यांनी काल वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार सहाय्यक परराष्ट्र मंत्री पॉल कपूर यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशातली भागीदारी आणखी दृढ करण्यासंबंधात तसंच सामायिक प्राधान्यक्रमांवर काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.   कपूर या...

November 7, 2025 2:00 PM November 7, 2025 2:00 PM

views 21

एनएसडब्ल्यू खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रतिका सुथंतिरा सीलन हिचा उपांत्य फेरीत प्रवेश

सिडनी इथं सुरू असलेल्या एनएसडब्ल्यु खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथंतिरा सीलन हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅरन ब्लूम हिच्यावर ११-८, ११-७, ११-४ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला.

November 4, 2025 8:04 PM November 4, 2025 8:04 PM

views 19

हिंदुजा उद्योगसमूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं निधन

प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदुजा उद्योगसमूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं आज लंडनमधे निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. ब्रिटनमधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तिंमधे त्यांचा समावेश होता. मुंबईत हिंदुजा उद्योगसमूहातून त्यांनी कारकिर्दीला प्रारंभ केला होता. गेली दोन वर्षं हिंदुजा समूहाचं अध्यक्षपद त्यांच्याकड...

November 4, 2025 7:53 PM November 4, 2025 7:53 PM

views 16

छत्तीसगडमधे प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ४ मृत्यू, २० जण जखमी

छत्तीसगडमधे बिलासपूर इथे लालखदान परिसरात आज प्रवासी रेल्वेगाडीची मालगाडीशी टक्कर होऊन अपघात झाला. दुर्घटनास्थळी  आतापर्यंत ४ मृतदेह सापडले असून अपघातात २० जण जखमी झाले आहेत. रेल्वे विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू केलं आहे.

November 1, 2025 6:54 PM November 1, 2025 6:54 PM

views 104

मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. या नोंदणीला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.   ख...

November 1, 2025 3:34 PM November 1, 2025 3:34 PM

views 17

देशभरात हिवाळ्याची चाहूल लागत असून हिमाचल प्रदेशात हिमवर्षावाची शक्यता

देशभरात आता हिवाळ्याची चाहूल लागत असून हिमाचल प्रदेशात रात्रीचं तापमान खाली आलं असून येत्या मंगळवार बुधवारी हिमवर्षावाची शक्यता आहे.   बंगालच्या उपसागरावरच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी होत आहे. येत्या मंगळवारपासून पाऊस ओसरेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.   अंदमान आणि निकोबार द्वीप...

November 1, 2025 3:27 PM November 1, 2025 3:27 PM

views 25

भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं निधन

भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं आज वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. केरळच्या कन्नूर इथले रहिवासी असलेले फ्रेडरिक यांनी १९७२ म्युनिक ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. आपल्या धाडसी गोलरक्षणाबद्दल परिचित असलेल्या फ्रेडरिक यांनी १९७१ ते १९७८ दोन विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला. &nbs...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.