मिश्र

January 7, 2025 2:31 PM January 7, 2025 2:31 PM

views 14

आसाममध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू

आसाममधे दिमा हसाओ जिल्ह्यात उमरंगसो इथं कोळशाच्या खाणीत अडकलेल्या ९ खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी लष्करानं राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलबरोबर संयुक्त मोहीम सुरू केली आहे. आसाम सरकारनं नौदलाचे पाणबुडे मागितले आहेत. बचावकार्याची पाहणी करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातल्या स...

January 7, 2025 1:36 PM January 7, 2025 1:36 PM

views 14

नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जणांचा मृत्यू

नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जण मृत्युमुखी पडले, तर ३८ जण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेट मधल्या झिझांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या काही भागात या भूकंपाचे धक्के बसले....

January 7, 2025 11:10 AM January 7, 2025 11:10 AM

views 10

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रपतींनी केला तीव्र निषेध

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या आयइडी स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला; यामध्ये 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये तीन जिल्ह्यांत शोधमोहीम राबवून सुरक्षा य...

January 7, 2025 10:50 AM January 7, 2025 10:50 AM

views 14

दिल्ली, नोएडासह देशाच्या उत्तर भागात आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

देशात बिहार, दिल्ली नोएडा, आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा भूकंप जाणवला. नेपाळमधील लोबुचे पासून 93 किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये या भूकंपाची 7 पूर्णांक 1 रिख...

January 7, 2025 10:22 AM January 7, 2025 10:22 AM

views 17

बीड शहरात काढण्यात आला संविधान बचाव मोर्चा

बीड शहरात काल संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला. परभणी इथल्या घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.  

January 7, 2025 9:14 AM January 7, 2025 9:14 AM

views 8

तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा ११ जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात देव...

January 6, 2025 8:48 PM January 6, 2025 8:48 PM

views 3

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे. विष्णू चाटे याची पोलीस कोठडीत चार दिवसांची तर जयराम चाटे, महेश केदार, आणि प्रतीक घुले याची पोलीस कोठडी न्यायालयानं १२ दिवसांनी वाढवली.

January 5, 2025 7:42 PM January 5, 2025 7:42 PM

views 8

गुजरातमधे झालेल्या हेलिकॉप्टरअपघातात तिघांचा मृत्यू

भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आज गुजरात मधल्या पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात दोन वैमानिक आणि एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर आपला नियमित सराव करत असताना ही दुर्घटना घडली, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरु झाल्याचं तटरक्षक दलानं सांगितलं.

January 5, 2025 7:20 PM January 5, 2025 7:20 PM

views 10

नांदेड स्फोट प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाची १२ जणांची निर्दोष मुक्तता

नांदेड मध्ये पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं १२ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या स्फोटात दोन जण ठार झाले होते. या प्रकरणाच्या पोलीस तपासात वेगवेगळ्या बाबी पुढे आल्या होत्या. त्यानंतर तो  सीबीआय कडे सोपवण्यात आल्यानंतर सी बी आयनं सखोल तप...

January 4, 2025 3:49 PM January 4, 2025 3:49 PM

views 2

पंजाबमध्ये झालेल्या रस्ते अपघातात ३ जण ठार, ३० जण जखमी

पंजाब मध्ये बर्नाला इथं आज झालेल्या एका रस्ते अपघातात ३ जण ठार आणि ३० जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना भटिंडा आणि फरीदकोट इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.