मिश्र

February 16, 2025 8:15 PM February 16, 2025 8:15 PM

views 3

पूर्व माली मध्ये सोन्याची खाण कोसळून झालेल्या अपघातात ४८ जणांचा मृत्यू

पूर्व माली मध्ये सोन्याची खाण कोसळून झालेल्या अपघातात ४८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार काल डाबिया कम्युन मधल्या बिलाली कोटो इथं हा अपघात झाला. चीनी नागरिकांनी चालवलेली ही खाण कायदेशीर आहे की नाही याचा तपास अधिकारी करत आहेत.

February 15, 2025 8:28 PM February 15, 2025 8:28 PM

views 12

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहताला अटक

मुंबईतल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.  हितेश मेहता यानं कोविड काळात बँकेच्या प्रभादेवी कार्यालयातून ११२ कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून १० कोटी असे एकूण १२२ कोट...

February 14, 2025 8:27 PM February 14, 2025 8:27 PM

views 14

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ इराणी नागरिकांना अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन इराणी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ किलो १४३ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास ६ कोटी २८ लाख रुपये इतकी आहे. हे तिन्ही प्रवासी दुबईहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.

February 14, 2025 3:17 PM February 14, 2025 3:17 PM

views 8

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीचे हिरे जप्त

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीचे हिरे जप्त केले. या हिऱ्यांची  तस्करी करणाऱ्या तस्कराला अटक करण्यात आली असून अधिक चौकशीसाठी त्याला विमानतळावरच्या गुप्तचर विभागाकडे सोपवलं आह...

February 11, 2025 8:30 PM February 11, 2025 8:30 PM

views 9

इन्स्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक पर्याय उपलब्ध

लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मेटा या कंपनीने केली आहे. अनावश्यक मेसेजेस रोखणं, गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय, पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल. १६ वर्षं वयापेक्...

February 11, 2025 3:08 PM February 11, 2025 3:08 PM

views 5

ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आग लागल्याने १० दुकानं जळून खाक

ओशिवरा इथल्या फर्निचर बाजाराला आज सकाळी आग लागल्याने १० दुकानं जळून खाक झाली. जोगेश्वरी पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावरच्या या बाजारातल्या लाकडी सामानाच्या गोदामाला सकाळी साडे अकराच्या सुमाराला आग लागली. अग्निशमन दलाच्या २० गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसू...

February 11, 2025 2:08 PM February 11, 2025 2:08 PM

views 3

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला आहे. या वाढीमुळे आज २४ कॅरेट सोने ८७ हजार रुपयांच्या तर २२ कॅरेट सोने देखील ८० हजार रुपयांच्या पातळीवर पोहचलं आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७ हजार २२० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅ...

February 10, 2025 3:30 PM February 10, 2025 3:30 PM

views 10

आकाशवाणी मुंबईच्या केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं निधन

आकाशवाणी मुंबईच्या CSU अर्थात केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९८९ पासून ते आकाशवाणीच्या सेवेत कार्यरत होते. केंद्रीय विक्री विभाग, मुंबई तसंच रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं. 

February 10, 2025 9:02 AM February 10, 2025 9:02 AM

views 16

छत्तीसगढमध्ये 31 नक्षलवादी ठार

छत्तीसगढमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत काल 31 नक्षलवादी ठार झाले आणि 2 जवान शहीद झाले. बीजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर यांच्...

February 8, 2025 7:14 PM February 8, 2025 7:14 PM

views 7

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज पहाटे मुंबईत त्यांचं राहत्या घरी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आण...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.