मिश्र

March 5, 2025 9:47 AM March 5, 2025 9:47 AM

views 14

मध्य रेल्वेचे ११ कर्मचारी सुरक्षा पुरस्काराने सन्मानित

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मिना यांच्या हस्ते काल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   कल्याण स्थानकात, सिग्नल आणि दूरसंचार विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्य...

March 3, 2025 6:57 PM March 3, 2025 6:57 PM

views 3

येत्या दोन दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेची लाट

गेल्या चोवीस तासात कोकण, विदर्भ, आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.  राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रम्हपुरी इथं ३८ अंश ६ शतांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

March 1, 2025 9:20 PM March 1, 2025 9:20 PM

views 13

ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचं निधन

ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.   डॉ. प्रभू यांनी सुमारे २० वर्षं लंडनमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम केलं. त्यांनी जगातल्या अनेक देशांमध...

February 24, 2025 1:44 PM February 24, 2025 1:44 PM

views 17

ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन

ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि दूरदर्शनच्या सह्याद्री या मराठी वाहिनीवरील वृत्त निवेदक अनंत भावे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखन, कथासंग्रहाबरोबरच त्यांनी विपुल प्रमाणावर बालसाहित्याचं लेखन केलं. अग्गड हत्ती तग्गड बंब, अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी यासारखी अनेक पु...

February 22, 2025 7:53 PM February 22, 2025 7:53 PM

views 20

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याहून आलेले हे तीन जण आज सकाळी तारकर्ली समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यांना बचाव पथकानं बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं.

February 22, 2025 1:49 PM February 22, 2025 1:49 PM

views 13

शस्त्रबंदी कायम ठेवण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती

शस्त्रबंदी कायम ठेवणं आणि भविष्यात गैरसमज टाळण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे. जम्मू - काश्मिरातल्या पूंछमध्ये दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरच्या बैठकीत ही चर्चा झाली. सुमारे ४ वर्षांनंतर अशा प्रकारची बैठक झाली.   नुकतीच झालेली चकमक आणि ताबारेषेवर आढळून आलेल्या बॉम्बची पार्श्व...

February 20, 2025 1:38 PM February 20, 2025 1:38 PM

views 3

छत्तीसगडच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस

छत्तीसगडच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं राज्यातल्या काही भागात गारपीटीचा इशाराही दिला आहे. रांची, खुंटी, सिमडेगा, पूर्व सिंघभूम, सेराईकेला खारवास या भागात वीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. 

February 20, 2025 1:19 PM February 20, 2025 1:19 PM

views 22

मध्य प्रदेश मघ्ये वाहन अपघातात ३ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातल्या भिंड इथं आज सकाळी दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले. मृत प्रवासी एका लग्नसोहळ्यासाठी जात होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

February 20, 2025 1:16 PM February 20, 2025 1:16 PM

views 13

जौनपूर इथं दोन वेगवेगळ्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथं काल रात्री उशीरा झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत.   पहिल्या अपघातात बदलापूर भागात सुल्तानपूर रस्त्यावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या चारचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मृतांमधे ...

February 20, 2025 1:12 PM February 20, 2025 1:12 PM

views 17

मणिपूरमधे ४ दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमधल्या चुराचंदपूर, थौबल आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या संघटनाच्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातला एक जण युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचा सदस्य आहे, तर बाकीचे तिघं कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मागच्या दोन दिवसांत शस्रास्त्र आ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.