मिश्र

March 17, 2025 4:01 PM March 17, 2025 4:01 PM

views 14

ठाणे जिल्ह्यात माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक

ठाणे जिल्ह्यात बदलापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह फोटो माजी नगरसेवकाला या चौघांनी पाठवला होता. हा फोटो समाज माध्यमावर टाकण्याची बदनामीची धमकी देत नगरसेवकाकडे ५० लाख रु...

March 16, 2025 2:06 PM March 16, 2025 2:06 PM

views 8

ओडिया साहित्यिक रमाकांत रथ यांचं निधन

विख्यात ओडिया साहित्यिक रमाकांत रथ यांचं आज सकाळी भुवनेश्वर इथे वार्धक्क्यानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. ओडिया साहित्यातले आधुनिकतावादी कवी अशी ओळख असणाऱ्या रथ यांना २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. १९५७ सालच्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी असणारे रथ यांनी ...

March 15, 2025 9:09 PM March 15, 2025 9:09 PM

views 11

तेलंगणामध्ये ६४ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणा मध्ये बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी- माओवादी या संघटनेच्या ६४ सदस्यांनी आज भद्रादि कोठागुडम जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात ४८ पुरुष तर १६ महिला माओवाद्यांचा समावेश आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. 

March 15, 2025 9:07 PM March 15, 2025 9:07 PM

views 14

चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही घटना घडली. हे तरुण चिमूर तालुक्यातल्या साटगाव कोलारी इथले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं सर्व युवकांचे मृतदेह  बाहेर काढले असून यातले चार जण एकाच कुटुंबातली भावंडं आहेत.

March 14, 2025 9:08 PM March 14, 2025 9:08 PM

views 10

RBI ला लंडनच्या सेंट्रल बँकिंग संस्थेचा 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐀𝐰𝐚𝐫𝐝 जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेला लंडनच्या सेंट्रल बँकिंग या संस्थेचा २०२५ या वर्षाचा 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐀𝐰𝐚𝐫𝐝 जाहीर झाला आहे. बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विकसित केलेल्या प्रवाह आणि सारथी या सॉफ्टवेअर करता हा पुरस्कार मिळाला आहे. यामुळं रिझर्व्ह बँकेतल्या अनेक प्रक्रिया कागद विरहित झाल्या आहेत.

March 14, 2025 7:52 PM March 14, 2025 7:52 PM

views 15

येत्या दोन दिवसात देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा

येत्या दोन दिवसांत छत्तीसगढ, झारखंड, विदर्भ, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात ओडिशामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातही तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.    तर जम...

March 14, 2025 6:18 PM March 14, 2025 6:18 PM

views 6

भंडाऱ्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भंडारा जिल्ह्यातल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात गेल्या २४ जानेवारीला झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा स्फोट यंत्र आणि उपकरणांची दुरुस्ती करण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गुन्हा दाखल करण्यात आलेले चारही अधिकारी संरक्षण उ...

March 13, 2025 8:57 PM March 13, 2025 8:57 PM

views 17

१२ वीच्या परीक्षा शनिवारी वेळापत्रकानुसार होणार – CBSE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या शनिवारी होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं हे स्पष्ट केलं आहे. या दिवशी मूळ हिंदी आणि वैकल्पिक हिंदी विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

March 11, 2025 8:54 PM March 11, 2025 8:54 PM

views 9

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना अटक

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना आज पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. हरयाणात हिसार इथल्या खासगी विद्यापीठाचे ७ विद्यार्थी आणि एक प्राध्यापक, युवा विनिमय कार्यक्रमाअंतर्गत लंडनला जात असल्याचं भासवून हे सर्व ८ जण लंडनला निघाले होते. मात्र इमिग्रेशन खिडकीवर त्यांच...

March 8, 2025 3:28 PM March 8, 2025 3:28 PM

views 7

बुलडाणा समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, दहा जण जखमी

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या चारचाकीचं टायर फुटल्यानं ती मागून येणाऱ्या कारला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्काली...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.