मिश्र

March 29, 2025 7:38 PM March 29, 2025 7:38 PM

views 21

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार झाले. यामध्ये ११ महिलांचा  समावेश आहे.  केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षली विरोधी  मोहीम राबवली होती. या चकमकी दरम्यान सुर...

March 28, 2025 1:22 PM March 28, 2025 1:22 PM

views 14

छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करण्यात यश

छत्तीसगढ च्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी नक्षलवाद्यांनी पेरलेलं एक शक्तिशाली स्फोटक शोधून ते निकामी केलं. हे स्फोटक  ४५ किलो वजनाचं असून एका मिनी ट्रक चा विध्वंस करून जमिनीत १५ फुटांचा खड्डा पडेल इतकं  ते  शक्तिशाली होतं . केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  २२२व्या  बटालियनने आज सकाळी एका ...

March 28, 2025 9:50 AM March 28, 2025 9:50 AM

views 56

जम्मू आणि काश्मिरमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार; 3 जवानांना वीरमरण

जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात सुफियाच्या जंगलात काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवानांना वीरमरण आलं. तर एका पोलिस उपअधीक्षकांसह चार सुरक्षा कर्मचारी आणि पॅरा कमांडो जवान जखमी झाले आहेत. जुधाना भागातील जंगलात काल सकाळपासून दहशतवाद्यांचा शोध सुरु असताना या लपून बसलेल्या दहशतव...

March 22, 2025 8:41 PM March 22, 2025 8:41 PM

views 63

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

साहित्यक्षेत्रात अतिशय मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये रोख, सरस्वतीची कांस्यप्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ८८ वर्षांचे शुक्ल, हा पुरस्कार मिळवणारे हिंदीतले बारावे, तर छत्तीसगड...

March 22, 2025 5:34 PM March 22, 2025 5:34 PM

views 12

ISRO: २०३० सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल- डॉ. व्ही. नारायणन

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाण्याच्या आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्याच्या मोहिमेवर काम करत असल्याचं इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून, २०४० सा...

March 22, 2025 5:24 PM March 22, 2025 5:24 PM

views 16

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्दसाठी एकत्रित काम करण्याचं न्या. भूषण गवई यांचं आवाहन

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे,  असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं. गवई यांनी विक्रम नाथ, एम एम सुंद्रेश आ...

March 22, 2025 2:54 PM March 22, 2025 2:54 PM

views 19

पूर्व आणि ईशान्य भारतात मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील- हवामान विभाग

पूर्व आणि ईशान्य भारतात उद्यापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याच काळात दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील.    मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि ओदिशामध्ये आज वादळी...

March 19, 2025 7:52 PM March 19, 2025 7:52 PM

views 21

येत्या दोन दिवसात मराठवाड्यात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काल किंचित वाढ झाली.   मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात उल्लेखनीय वा...

March 17, 2025 8:05 PM March 17, 2025 8:05 PM

views 8

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात काही ठिकाणी काल उष्णतेची लाट होती. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत...

March 17, 2025 7:49 PM March 17, 2025 7:49 PM

views 15

काश्मीर कुपवारा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अज्ञात दहशतवादी ठार

उत्तर काश्मीरातल्या कुपवारा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानं प्रत्युत्तर दिलं. घटनास्थळावरुन एक एके ४७ रायफल जप्त करण्यात आली, असं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.