मिश्र

April 8, 2025 7:20 PM April 8, 2025 7:20 PM

views 9

राजस्थानात मद्यधुंद चालकामुळे ९ जणं चिरडून ठार, तर ६ जण गंभीर जखमी

राजस्थानात जयपूरच्या नाहरगडमध्ये काल रात्री मद्यधुंद चालकानं ९ जणांना चिरडून ठार केलं तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं असून आतापर्यंत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.  खबरदारीचा उपाय म्हणून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

April 8, 2025 6:59 PM April 8, 2025 6:59 PM

views 12

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात बहुतांश भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्या...

April 7, 2025 8:22 PM April 7, 2025 8:22 PM

views 10

विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमानात किंचित वाढ झाली, रात्रीचं तापमान सरासरीइतकंच होतं. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे तर याच कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आह...

April 7, 2025 7:53 PM April 7, 2025 7:53 PM

views 12

छत्तीसगडमधे ३१ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तिसगडमधल्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमधे मिळून आज ३१ माओवाद्यांनी शरणागती पत्करली.  दंतेवाडा जिल्ह्यातून २६ माओवाद्यांनी शरणागती पत्करली, त्यातल्या तीन माओवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी साडेचार लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं.   नारायणपूर जिल्ह्यात पाच महिला माओवाद्यांनी शरणागती पत्करल...

April 7, 2025 6:35 PM April 7, 2025 6:35 PM

views 28

VVPAT रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणीची मागणी करणारी याचिका फेटाळली

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामधल्या व्हीव्हीपॅट रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्यापुढं आज यावर सुनावणी झाली...

April 5, 2025 3:40 PM April 5, 2025 3:40 PM

views 14

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. तसंच ९ एप्रिल पर्यंत कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

April 5, 2025 3:31 PM April 5, 2025 3:31 PM

views 12

लातूर – टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू

लातूर शहरात गंजगोलाई भागात एका टेम्पोनं मोटारसायकलला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. तर याच भागात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळून त्याखाली एक रिक्षा आणि दोन दुचाकी अडकल्या. मात्र यात जीवितहानी झाली नाही.

April 5, 2025 1:41 PM April 5, 2025 1:41 PM

views 16

देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा तर दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पुढचे चार ते पाच दिवस भारताच्या वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात ९ एप्रिल पर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या ९ तारखेपर्यंत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्...

April 5, 2025 8:46 AM April 5, 2025 8:46 AM

views 17

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

April 5, 2025 4:05 PM April 5, 2025 4:05 PM

views 5

प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवू लागल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह, वादळवाट, चार दिवस सासूचे, दामिनी यांसारख्या...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.