मिश्र

April 12, 2025 2:36 PM April 12, 2025 2:36 PM

views 11

दहशतवाद्यांच्या नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला

जम्मू काश्मीरच्या अखनूर विभागात दहशतवाद्यांच्या समूहाचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाणून पाडला. अखनूरमधे केरी भट्टल परिसरात काल रात्री काही सशस्त्र दहशतवाद्यांची हालचाल लष्करानं टिपली, आणि त्यांना शरण यायला सांगितलं.   त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचा कनिष...

April 12, 2025 2:34 PM April 12, 2025 2:34 PM

views 6

छत्तीसगढच्या चकमकीत २ माओवादी ठार

छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत २ माओवादी ठार झाले. या जिल्ह्यात इंद्रावती जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवण्यात येत होती. त्यादरम्यान ही चकमक झाली. सुरक्षादलांनी दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शोधमोहीम अद्याप सुरु आहे.

April 11, 2025 2:57 PM April 11, 2025 2:57 PM

views 10

देशात बहुतांश राज्यात उष्णतेची लाट

देशात बहुतांश राज्यात उष्णतेची लाट आलेली असताना काही राज्यांमध्ये मात्र वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य प्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली होती. मात्र, आजपासून पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे....

April 10, 2025 10:31 AM April 10, 2025 10:31 AM

views 6

तिरुपती-पकला-कटपाडी रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला मंजुरी

आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील तिरुपती-पकला-कटपाडी या रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला सरकारनं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती काल नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पामुळे वेल्लोर आणि तिरुपती या शैक्षण...

April 9, 2025 3:18 PM April 9, 2025 3:18 PM

views 18

गुजरातमधे आज होत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आज गुजरातमधे साबरमती नदीच्या काठावर होत आहे. तिरस्कार, नकारात्मकता आणि निराशेचं वातावरण बदलून न्याय आणि संघर्षाच्या मार्गाने जाण्याचा निर्धार महासचिव सचिन पायलट यांनी व्यक्त केला. महात्मा गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकरल्याला १०० वर्षं पूर्ण होत असून सरदार व...

April 9, 2025 3:03 PM April 9, 2025 3:03 PM

views 13

आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं निधन

आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं नुकतंच पवनार आश्रमात निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. कालिंदीताई विनोबांच्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या. कालिंदीताईंच्या दैनंदिनीच्या आधारे लिहिले गेलेलं 'विनोबांची पूर्व पाकिस्तान भूदान-पदयात्रा' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पवनार आश्रमातू...

April 9, 2025 5:34 PM April 9, 2025 5:34 PM

views 14

दुबईच्या उपप्रधानमंत्र्यांनी आज मुंबई शेअर बाजाराला दिली सदिच्छा भेट

भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे उपप्रधानमंत्री युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक़तूम यांनी आज मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट दिली. मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरारामन रामामूर्ती यांनी युवराज अल मकतुम आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. तसंच स्टॉक ...

April 9, 2025 10:23 AM April 9, 2025 10:23 AM

views 50

राज्यात येत्या २-४ दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या बहुतांश भागात सध्या तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. अकोला इथं काल राज्यातील सर्वात जास्त 44 पूर्णांक 2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या 2-4 दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  

April 8, 2025 8:44 PM April 8, 2025 8:44 PM

views 12

छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये आज २२ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यातल्या चौघांवर २६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. यावर्षी बिजापूर जिल्ह्यात १८० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. 

April 8, 2025 7:46 PM April 8, 2025 7:46 PM

views 18

जयपूरात १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप

राजस्थानात जयपूर इथे १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या चार दहशतवाद्यांना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी ४ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत या चारही दहशतवाद्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दहशतवाद हा समाजासाठी धोका असून अशा गुन्हेगारांना कोणतीही दया दाख...