मिश्र

April 23, 2025 10:39 AM April 23, 2025 10:39 AM

views 16

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह २ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अद्याप ओळख पटवण्याचं आणि बचावकार्य सुरू असल्यामुळे मृतांचा आणि जखमीं...

April 22, 2025 1:43 PM April 22, 2025 1:43 PM

views 7

दहशतवादी संघटनांशी संबध असल्याच्या आरोपावरुन २ जणांना अटक

दहशतवादी संघटनांशी संबध असल्याच्या आरोपावरुन पंजाब पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. ‘वारिस दे पंजाब टीम’ या नावाच्या व्हॉटसअप समूहावरचं त्यांचं संभाषण व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.   राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटकेत असलेल्या खासदार अमरितपाल सिंग यांच्या अटकेला विरोध...

April 22, 2025 1:31 PM April 22, 2025 1:31 PM

views 7

कैलास मानसरोवर यात्रा येत्या ३० जूनपासून पुन्हा सुरु

कोविडमुळे गेली ४ वर्षं स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा येत्या ३० जूनपासून पुन्हा सुरु होत आहे. यंदा यात्रेकरू उत्तराखंड मार्गाने  कैलास मानसरोवरसाठी रवाना होणार असून, उत्तराखंड सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली यात्रा आयोजित केली जाईल. कुमाऊं मंडळ विकास निगम कडे यात्रेच्या व्यवस्थापन...

April 22, 2025 1:24 PM April 22, 2025 1:24 PM

views 6

विदर्भासह उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढले दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.   कोकण, मराठवाडा, गोवा, गुजरात, बिहार, झारखंड, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि रायलसीमा मध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. ...

April 18, 2025 8:16 PM April 18, 2025 8:16 PM

views 26

भारत आपल्या अंतराळ प्रवासात पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज

आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायूसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. अ‍ॅक्सिओम स्पेसच्या ए एक्स-४ या अंतराळ मोहिमेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली आहे. या मोहिमेद्वारे भारत आप...

April 18, 2025 2:44 PM April 18, 2025 2:44 PM

views 7

जेईई मुख्य परिक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

जेईई मुख्य परिक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. जेईई मेन २०२५ सत्र २ च्या अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी २ वाजेपर्यंत जेईई मेन वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे.

April 17, 2025 8:32 PM April 17, 2025 8:32 PM

views 13

SC : वक्फ सुधारणा कायद्यातल्या काही तरतुदींची अंमलबजावणी प्रलंबित ठेवण्याचे आदेश

वक्फ सुधारणा कायद्यातल्या तरतुदींनुसार वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ कौन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही, असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. केंद्र सरकारतर्फे सॉलिस्टिर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारनं स...

April 17, 2025 3:23 PM April 17, 2025 3:23 PM

views 11

प्रधानमंत्री मोदी यांनी माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली

माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रशेखर यांचं राजकारण नेहमी देशाच्या हितासाठी होतं. सामाजिक सद्भावना आणि देशाच्या विकासातलं त्यांचं योगदान नेहमी स्मरणात राहील.

April 17, 2025 2:05 PM April 17, 2025 2:05 PM

views 13

बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

गुजरातच्या पाटण जिल्ह्यात समी - राधनपूर महामार्गावर गुजरात राज्य परीवहन महामंडळाच्या बसने एका रिक्षाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात रिक्षात बसलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळावर पोचून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.  

April 17, 2025 10:59 AM April 17, 2025 10:59 AM

views 11

उत्तम आरोग्यासाठी रोज केळी खाण्याचा आरोग्यतज्ञांचा सल्ला

अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातल्या रावेर इथं काल जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. केळ्यांमधल्या पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचं सेवन वाढावं यासाठी केळी दिवस साजरा केला जातो... जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळ्यांचं उत्पादन भारतात होतं. मात्र भारतीयांमध्ये आवश...