मिश्र

May 23, 2025 1:15 PM May 23, 2025 1:15 PM

views 11

छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात किस्ताराम इथं नक्षलवादी आणि सुरक्षा दलात काल संध्याकाळी चकमक झाली. या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला. या भागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल, विशेष कार्यदल आणि केंद्रीय राखील पोलिसांची कोब्रा बटालियन यांना पाठवलं होतं. सुरक्षा दलाच्या जवान आणि नक...

May 20, 2025 8:32 PM May 20, 2025 8:32 PM

views 11

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

कल्याणमध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं. दुपारी तीनच्या सुमाराला या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडल्याची माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. यात ढिगाऱ्याखाली...

May 19, 2025 2:37 PM May 19, 2025 2:37 PM

views 12

अब्दुल्ला जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू

बलुचिस्तानच्या किल्ला अब्दुल्ला जिल्ह्यात जब्बार मार्केटजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. स्फोटानंतर फ्रंटिअर कोअर आणि अज्ञात बंदूकधाऱ्यांमध्ये चकमकही झाली. सुरक्षादलांनी या भागात नाकेबंदी करून शोधमोहीम राबवली.

May 19, 2025 11:09 AM May 19, 2025 11:09 AM

views 20

केरळ किनारपट्टी भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुढचे पाच दिवस कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ तसंच आसपासच्या भागात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या हिमालयीन भागातही वादळी वारे आणि वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.   राजस्थानच्या पश्चिम भागात मात्र आणखी चार दिवस ...

May 18, 2025 8:37 PM May 18, 2025 8:37 PM

views 11

कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमधे येत्या शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमधे आजपासून २४ मे पर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगालमधील हिमालयाचा पायथा, सिक्किम मधे पुढच्या पाच ते सहा दिवसांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.    पश्चिम राजस्थान आणि जम्मू ...

May 18, 2025 8:34 PM May 18, 2025 8:34 PM

views 6

हैद्राबादच्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत १७, तर सोलापूरात कारखान्यात आगीत ८ जणांचा मृत्यू

हैद्राबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधे ८ लहान मुलं आणि ६ महिलांचा समावेश आहे. गजबजलेल्या परिसरातल्या या दुमजली इमारतीत शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ८ जणांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला, तर ९ जण उपचारादरम्...

May 17, 2025 1:57 PM May 17, 2025 1:57 PM

views 4

ईशान्य भारतात पुढले ७ दिवस वादळी पावसाची शक्यता

ईशान्य भारतात पुढले सात दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून  अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये आज जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, तर आंध्रप्रदेशची किनारपट्टी, कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करैकल आणि तेलंगणात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.    दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि नै...

May 14, 2025 1:05 PM May 14, 2025 1:05 PM

views 18

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. यात दुर्घटनेतल्या १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक रुग्णालयाने दिली आहे. अमृतसरच्या मजिठा इथे काल ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्...

May 13, 2025 7:46 PM May 13, 2025 7:46 PM

views 11

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१ झाली आहे. अमृतसरच्या मजीठा भागातल्या चार गावातल्या नागरिकांनी काल रात्री इथेनॉल मिश्रीत दारू प्यायली होती. याप्रकरणी दहा जणांना अटक केलं असून दोन उत्पादन शुल्क अधिकारी, एक पोलिस उपअधिक्षक आणि एका पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.    ...

May 12, 2025 2:28 PM May 12, 2025 2:28 PM

views 11

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली शिबिरं उद्ध्वस्त

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे आज चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार आणि जखमी  झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी नक्षली शिबिरं उद्ध्वस्त केली असून त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे.