मिश्र

May 31, 2025 6:22 PM May 31, 2025 6:22 PM

views 18

पालघरमधे मेंढवन घाटात अपघातात दोघांचा मृत्यू

पालघरमधे मेंढवन घाटात आज कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार गुजरातहून मुंबईकडे येत होती. कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.

May 29, 2025 8:57 PM May 29, 2025 8:57 PM

views 11

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 4 जवान ठार

पाकिस्तानात उत्तर वझिरास्तानच्या शावल भागात एका सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान ठार झाले.   काल रात्री दहशतवाद्यांनी या चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं अद्याप घेतलेली नाही. मात्र, पाकिस्तानी तालिबान आणि इतर दहशतवादी गट या...

May 28, 2025 4:56 PM May 28, 2025 4:56 PM

views 15

देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस जास्त पडण्याचा अंदाज

देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. देशात यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन लवकर झालं आहे. पुढच्या महिन्यात वायव्य भारतात काही भागांमध्ये तसंच मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची  शक्यता आहे. कर्नाटकचा...

May 25, 2025 8:21 PM May 25, 2025 8:21 PM

views 11

नैऋत्य मान्सून कर्नाटकात दाखल; किनारी भागांना रेड अलर्ट

नैऋत्य मान्सून कर्नाटकात दाखल झाला आहे परिणामी कर्नाटकच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडला आहे. मंगळुरू, पनंबूर आणि कारवार इथं सर्वाधिक पाऊस पडला. हवामान विभागानं किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात, सतत पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडली आहेत आणि विजेचे खांब...

May 25, 2025 7:17 PM May 25, 2025 7:17 PM

views 9

डॉलरच्या घसरणीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सर्वोच्च वाढ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या घोषणेनंतर आणि डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत सर्वोच्च वाढ नोंदवली गेली. या आठवड्यात सोन्याचे दर पाच टक्क्यांनी वाढून ३ हजार ३५७ डॉलर्स प्रतिऔंस इतके झाले आहेत. या आठवड्यात चांदीच्या किमतीतही ३३ डॉलर्स प्रति औंस इतक...

May 24, 2025 6:39 PM May 24, 2025 6:39 PM

views 32

अभिनेते मुकुल देव यांचं निधन

हिंदी चित्रपटातले अभिनेते  मुकुल देव यांचं काल रात्री मुंबई इथं निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. मुकुल यांचे भाऊ अभिनेते राहुल देव यांनी समाजमाध्यमाद्वारे मुकुल यांच्या निधनाची माहिती दिली. दिग्दर्शक हंसल मेहता, अभिनेता सुनील शेट्टी, नील नितीन मुकेश, अभिनेत्री सुष्मिता सेन, कंगना रनौत यांनी मुकुल देव...

May 23, 2025 9:12 PM May 23, 2025 9:12 PM

views 10

कोकणात रेड अलर्ट, तर १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्याच्या  विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरूच आहे. येत्या सोमवारपर्यंत  जिल्ह्याच्या किनारी भागात आणि इतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची  शक्यता आहे. रत्नागिरी शहराला आज  रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत ता...

May 23, 2025 7:32 PM May 23, 2025 7:32 PM

views 8

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार असलेले सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज अटक केली. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   वैष्णवीच्या मृत्यूनंतर आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार होते. प...

May 23, 2025 7:02 PM May 23, 2025 7:02 PM

views 15

रिझर्व बँककडून यावर्षासाठी केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर

भारतीय रिझर्व बँकेनं केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर केला आहे. बँकेच्या संचालकमंडळाची ६१६वी बैठक  आज मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षते खाली झाली. त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर झाला.    संचालक मंडळाने गेल्या १५ मे रोजी संमत केलेल्य...

May 23, 2025 3:24 PM May 23, 2025 3:24 PM

views 18

नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत ४ जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले.    दोन महिन्यापूर्वीच भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यावरुन संयुक्त शोध मोहिम सुर...