मिश्र

August 3, 2025 2:07 PM August 3, 2025 2:07 PM

views 12

मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित पाच जणांना अटक, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजित सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे. सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं, खंडणी, अपहरण...

August 3, 2025 12:46 PM August 3, 2025 12:46 PM

views 8

उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून ; मध्य प्रदेश, राजस...

August 3, 2025 12:09 PM August 3, 2025 12:09 PM

views 7

भारताला स्पेनकडून सोळा एअरबस सी-295 लष्करी वाहतूक विमानांचं हस्तांतरण

भारताला स्पेनकडून काल १६ एअरबस सी-२९५ लष्करी वाहतूक विमानं सोपविण्यात आली. स्पेनमधील सेव्हिल इथं भारतीय राजदूत दिनेश के. पटनायक आणि भारतीय वायु दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला.   गुजरातमधील वडोदरा इथल्या कारखान्यात ही विमानं जुळवली जातील. २१,९३५ कोटी रुपयांच्...

August 3, 2025 2:26 PM August 3, 2025 2:26 PM

views 7

कुलगाममध्ये झालेल्या चकमक तीन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत.   लष्करी कारवाईशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शुक्रवारी रात्री ८ वाजता देवसरमधे अखलच्या जंग...

July 29, 2025 1:34 PM July 29, 2025 1:34 PM

views 4

झारखंडमधे रस्ते अपघातात सहा कावडयात्रींचा मृत्यू, २४ जण जखमी

झारखंडमधल्या मोहनपूर गटातल्या देवघर-हंसदिहा रस्त्यावर आज सकाळी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा कावडयात्रींचा मृत्यू झाला, तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात  दाखल करण्यात  आलं आहे. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. हे कावडयात्री बस...

July 28, 2025 7:19 PM July 28, 2025 7:19 PM

views 17

श्रीनगरच्या लिदवास इथं तीन दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगरच्या हरवान परिसरातल्या लिदवास इथं लष्करानं आज तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. पहलगाममधे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बैसरन गावात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी महादेव ही मोहीम लष्करानं  सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आजची कारवाई केल्याच...

July 26, 2025 1:48 PM July 26, 2025 1:48 PM

views 13

झारखंड: चकमकीत जनता जन मुक्ती पार्टी नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार

झारखंडच्या गुमला जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जनता जन मुक्ती पार्टी या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार झाले. या तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. तसंच या ठिकाणावरून एके-४७ आणि इनसास रायफल्सही जप्त केल्या.

July 20, 2025 3:14 PM July 20, 2025 3:14 PM

views 19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

श्री संत नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज, पंढरपूर यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. संत नामदेव महाराज यांच्या ६७५व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या गुरुवारी २४ जुलै रोजी पंढरपुरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे....

July 19, 2025 3:23 PM July 19, 2025 3:23 PM

views 15

केरळ आणि उत्तराखंडमधे उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी

केरळ आणि उत्तराखंडच्या काही भागासाठी हवामान विभागानं उद्यापर्यंत अती जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिळनाडू, कोकण, गोवा आणि कर्नाटकमध्ये देखील आज जोरदार ते अती जोरदार पावसाचा  ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.    बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू आण...

July 19, 2025 1:12 PM July 19, 2025 1:12 PM

views 13

छत्तीसगड : नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगड मधे नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. राज्याचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी काल दुपारी अबुझमाडच्या जंगलात कारवाई केली. चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद...