मिश्र

August 11, 2025 2:39 PM August 11, 2025 2:39 PM

views 13

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तळाला चोहोबाजूंनी घेरलं असून या परिसरातलं हे आतापर्यंतचं सर्वात दीर्घ अभियान असल्याचं सांगितलं जात आहे. या अभियानात आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन जवानां...

August 10, 2025 1:50 PM August 10, 2025 1:50 PM

views 2

आज आंतरराष्ट्रीय सिंह दिवस

आज आंतरराष्ट्रीय सिंह दिवस साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रीतील भरीव कामगिरीच्या जोरावर अशियाई सिंहांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या ‘लायन ॲट फोर्टी सेव्हन’ अभियानातून हे शक्य झालं. आशियाई सिंहांचं भारतात ...

August 7, 2025 3:10 PM August 7, 2025 3:10 PM

views 6

संत कबीर हातमाग पुरस्कार सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना प्रदान

देश आज अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीचा विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत...

August 5, 2025 8:18 PM August 5, 2025 8:18 PM

views 3

भारत आणि फिलीपिन्स यांच्यात आज ९ सामंजस्य करार

भारत आणि फिलीपिन्स यांच्यात आज ९ सामंजस्य करार झाले. यात दोन्ही देशातील धोरणात्मक संबंध, गुन्हेगारी-संरक्षण-विज्ञान आणि तंत्रज्ञान याबाबत परस्पर कायदेशीर सहकार्य यांचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डीनांद रोमुअल देज मार्कोस ज्युनियर उपस्थित होते. &nbs...

August 5, 2025 7:17 PM August 5, 2025 7:17 PM

views 27

नागरिकांना रिक्षा, टॅक्सीची सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार छावा राइड ॲप सुरू करणार

ओला, उबेर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार ‘छावा राइड’ या ॲपच्या माध्यमातून राज्य सरकार नागरिकांना खासगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे.   या ॲपवरुन नागरिकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येईल. एसटी महामंडळ हे ॲप सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

August 5, 2025 1:17 PM August 5, 2025 1:17 PM

views 15

मद्यधुंद सैनिकानं वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची बातमी खोटी !

नागपूरमध्ये एका मद्यधुंद सैनिकानं आपल्या वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची प्रसार माध्यमावर फिरत असलेली बातमी खोटी असल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातल्या नागरधन इथं रविवारी घडलेल्या घटनेचं वृत्तसंस्थानी चुकीचं वार्तांकन केलं, असंही लष्करानं स्थानिक पोलिसांकडून घटनेची खरी माहिती घेऊन स...

August 5, 2025 11:06 AM August 5, 2025 11:06 AM

views 4

विमानवाहतूक क्षेत्रात भारताचा जगात पाचवा क्रमांक

भारतानं विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारतात 2024 मध्ये एकंदर 24 कोटी 10 लाख प्रवाशांची नोंद झाली असून, मुंबई-दिल्ली ही विमानतळ जोडी जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांच्या जोडीपैकी एक ठरली आहे.   आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटना म्हणजे आयएटीएनं 2024 चा जागतिक विमानवाहतु...

August 3, 2025 2:24 PM August 3, 2025 2:24 PM

views 56

अभिनेते माधवन बॉब यांचं चेन्नईमध्ये निधन

तामिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते माधवन बॉब यांचं काल संध्याकाळी चेन्नईमध्ये निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. त्यांनी कमल हसन, रजनीकांत, अजित, सूर्या आणि विजय यांच्यासोबत काम केलं आहे.   सुमारे ६०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यात तमिळ प्रमाणेच हिंदी, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमधल्या ...

August 3, 2025 2:21 PM August 3, 2025 2:21 PM

views 22

पोर्तुगालमध्ये उष्णतेची लाट,तापमान ४४ अंशांवर पोहोचण्याची शक्यता

पोर्तुगालमधे आज उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच जंगलातल्या वणव्यांमुळे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत उष्णता आणि वणव्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं पोर्तुगालच्या गृहमंत्री मारिया लुसिया यांनी सांगितलं.   उत्तर आ...

August 3, 2025 2:11 PM August 3, 2025 2:11 PM

views 109

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल. &n...