मिश्र

September 10, 2025 2:54 PM September 10, 2025 2:54 PM

views 32

मुसळधार पाऊसामुळे माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद

जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पाऊस आणि सततच्या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे.  रियासी जिल्ह्यात २६ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसाने जागोजागी दरडी कोसळल्या असून जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही काही ठिकाणी बं...

September 10, 2025 2:44 PM September 10, 2025 2:44 PM

views 13

झारखंडमधे आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक

झारखंडच्या दहशतवाद विरोधी दलाच्या पथकाने आज आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला रांची इथून अटक केली. त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. या संशयित दहशतवाद्याची ओळख पटली असून तो मूळचा बोकारो जिल्ह्यातल्या पेटारवार इथला आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

September 7, 2025 3:45 PM September 7, 2025 3:45 PM

views 69

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अरीना साबालेंका हिला सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिनं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरलं. तिनं अमांडा अनिसिमोव्हा हिच्यावर ६-३, ७-६ अशी थेट सेट्समध्ये मात करून कारकीर्दीतलं चौथं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. तर पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरॅशिओ झेबोलास या जोडीनं ज...

August 27, 2025 8:25 PM August 27, 2025 8:25 PM

views 17

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं कोपर्शी गावाजवळ आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. नक्षलवादी काही घातपात करायच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात मोहीम सुरू केली होती.   आज न...

August 27, 2025 7:57 PM August 27, 2025 7:57 PM

views 4

अफगाणिस्तानात बस अपघात,२५ ठार, २७ जखमी

अफगाणिस्तानात काबूलजवळच्या अरघंडी इथं आज सकाळी एक बस उलटून झालेल्या अपघातात २५ जण ठार तर २७ जण जखमी झाले.   कंधार ते काबूल महामार्गावरची घटना चालकाच्या बेपर्वाईमुळे झाल्याचं अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतिन कानी यांनी म्हटलं आहे.

August 27, 2025 7:55 PM August 27, 2025 7:55 PM

views 4

रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला

रशियानं युक्रेनच्या सहा भागांमधल्या ऊर्जा आणि गॅस क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात पोल्टावा भागातल्या गॅस वाहतूक आस्थापनेचं मोठं नुकसान झाल्याचं, तर सुमी भागात एका महत्त्वाच्या उपकेंद्रातल्या यंत्रसामग्रीलाही फटका बसल्याचं वृत्त आहे.   या हल्ल्यांमु...

August 27, 2025 7:53 PM August 27, 2025 7:53 PM

views 12

आशियाई नेमबाजी स्पर्धेत अनीश भनवालाला रौप्यपदक

कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या सू लियाबोफान यानं ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं.   स्पर्धेच्या वरिष्ठ गटाच्...

August 27, 2025 8:09 PM August 27, 2025 8:09 PM

views 6

वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.   जम्मूमध्ये २४ तासात ३८० मिलीमीटर पा...

August 27, 2025 6:33 PM August 27, 2025 6:33 PM

views 2

गाझा हल्ल्यात पत्रकारांच्या मृत्यूवर भारताची निषेधार्ह प्रतिक्रिया

इस्रायलाने गाजामधील खान युनुस इथ केलेल्या हल्ल्यात पत्रकारांचे झालेले मृत्यू धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया भारताने दिली आहे. संघर्षात नागरिकांचे मृत्यू होणे निंदनीय असल्याची भूमिका भारत नेहमीच घेत आला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.   हल्यात पत्रकारांचे मृत...

August 27, 2025 7:27 PM August 27, 2025 7:27 PM

views 35

राज्यात सर्वत्र ढोलताशाच्या गजरात गणरायाचं आगमन

१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना झाली. राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून मंगलमूर्तींचा हा उत्सव साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.