आंतरराष्ट्रीय

January 6, 2025 8:12 PM January 6, 2025 8:12 PM

views 10

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायू उत्खननावर बंदी

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायूच्या उत्खननावर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी जाहीर केली आहे. या आदेशात अमेरिकेच्या अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्रकिनाऱ्याच्या काही भागाचा,  मेक्सिकोचे आखात तसेच अलास्काजवळच्या बेरिंग समुद्राकडील  किनारपट्टीचा समावेश आहे.   बायडे...

January 6, 2025 8:10 PM January 6, 2025 8:10 PM

views 18

क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात बैठकीत चर्चा – एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय  सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय सहकार्य तसंच क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात  या बैठकीत चर्चा झाली. भारत अमेरिका भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी सुलिवान यांनी वैयक्ति...

January 6, 2025 8:00 PM January 6, 2025 8:00 PM

views 18

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताकडून निषेध

पाकिस्तानने अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी  आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याच्या वृत्तांची दखल भारत सरकारने घेतली असून विश...

January 6, 2025 1:00 PM January 6, 2025 1:00 PM

views 4

अमेरिकेत हिमवादळाची शक्यता

अमेरिकेच्या कॅन्सस, मिसूरी आणि इंडियाना सारख्या राज्यांमध्ये हिमवादळाची शक्यता असून सुमारे ६ कोटी लोकसंख्येला या हिमवादळाचा तडाखा बसू शकेल असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं दिला आहे. या हिमवादळामुळे ताशी ५० मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता या भागातून प्रवास करताना काळजी घ्यावी ...

January 6, 2025 1:25 PM January 6, 2025 1:25 PM

views 9

अमेरिकेनं लादलेले निर्बंध उठवण्याची सिरीयाची विनंती

अमेरिकेनं सीरियावर लादलेले निर्बंध उठवण्याची विनंती सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद हसन अल-शिबानी यांनी केली आहे. सिरीयातील सामान्य नागरिकांचं जीवनमान पुर्वपदावर आणण्यासाठी हे निर्बंध शिथील कारावेत असं कतारच्या राजनैतिक भेटीदरम्यान ते म्हणाले. कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांची त्यांनी काल भे...

January 5, 2025 8:02 PM January 5, 2025 8:02 PM

views 6

सीमा उल्लंघनप्रकरणी भारतीय आणि बांगलादेशी मच्छीमारांची सुटका

आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशाच्या ताब्यात असलेल्या ९५ भारतीय मच्छीमारांची आज भारतानं सुटका केली, तर भारतानंही आपल्या ताब्यात असलेल्या ९० बांगलादेशी मच्छीमारांची सुटका केली. बंगालच्या उपसागरातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर आज संध्याकाळी ही प्रक्रिया पार पडली. मुक्त झालेल...

January 5, 2025 1:11 PM January 5, 2025 1:11 PM

views 7

भारत आणि बांगलादेश ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार

भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या  मच्छीमारांची  सुटका करणार आहेत. बांगलादेशच्या ताब्यात असलेले  ९५ भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार असून, भारत ९० बांगलादेशी मच्छिमारांना सोडणार आहे. याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत. भारतीय मच्छीमार दोन महिन्यांहून अधिक काळ बांग...

January 5, 2025 12:10 PM January 5, 2025 12:10 PM

views 5

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन दोन दिवस भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आजपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा  करणार आहेत. अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रात उभयपक्षी संबंधावर त्यांची चर्चा होणार असून हिंद प्रशांत महास...

January 4, 2025 8:59 PM January 4, 2025 8:59 PM

views 3

पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय अधिकारी जयंत खोब्रागडे यांची नियुक्ती

पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी जयंत एन. खोब्रागडे यांची नियुक्ती झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी ही घोषणा केली. खोब्रागडे हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते आसियानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.   

January 4, 2025 7:35 PM January 4, 2025 7:35 PM

views 3

इक्वेडोरमध्ये ६० दिवसांची आणीबाणी जाहीर

इक्वेडोरमध्ये राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी, तिथे अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र संघर्ष सुरु असलेल्या सात प्रांत आणि तीन नगरपालिका क्षेत्रात ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि संघटित सशस्त्र गटांची वाढतं प्रमाण ही आणीबाणीची लागू करण्यामागची मुख्य कारणं असल्याचं नुबा य...