आंतरराष्ट्रीय

January 8, 2025 1:24 PM January 8, 2025 1:24 PM

views 14

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं बांग्लादेश सरकारकडून रद्द

बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागाने बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं रद्द केली आहेत. बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागारांचे उपसचिव अब्दुल कलाम आझाद यांनी ही माहिती वार्ताहर परिषदेत ...

January 8, 2025 11:00 AM January 8, 2025 11:00 AM

views 7

आंध्र प्रदेशातील गोदावरी ग्लोबल विद्यापीठात जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात

आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम इथल्या गोदावरी ग्लोबल विद्यापीठात आजपासून जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रसिद्ध तेलगू लेखक, साहित्यिक, तसंच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण; दोन्ही तेलगू राज्यांचे राज्यपाल; क...

January 8, 2025 10:54 AM January 8, 2025 10:54 AM

views 3

नोएडा इथे आजपासून फार्म-टू-फोर्क व्यापार प्रदर्शन सुरु

नोएडा इथल्या इंडिया एक्स्पोझिशन मार्टमध्ये आजपासून इंडसफूड 2025 हे 'शेतातून थेट ताटात' या संकल्पनेवर आधारित फार्म-टू-फोर्क हे व्यापार प्रदर्शन सुरु होत आहे. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इंडसफूड 2025 हे आशिया...

January 8, 2025 10:11 AM January 8, 2025 10:11 AM

views 14

नेपाळमधील भूकंपात आत्तापर्यंत 126 जणांचा मृत्यु

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात काल झालेल्या भुकंपातील मृतांची संख्या 126 वर पोहोचली आहे. चीनच्या अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी झालेल्या 7 पूर्णांक 1 रिख्टर पातळीच्या या भूकंपामध्ये 188 लोक जखमी झाले. भूकंपाचे केंद्र तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील झिझांग इथं होतं. इथं मालमतेचं ...

January 8, 2025 9:57 AM January 8, 2025 9:57 AM

views 3

ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाच्या चीनच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क

भारताच्या सीमेला लागून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर चीनकडून महाकाय धरण बांधण्याच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचं हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करत राहील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आग्रा इथं स्पष्ट केलं. &n...

January 7, 2025 7:08 PM January 7, 2025 7:08 PM

views 4

नेपाळ-तिबेट सीमा भागात झालेल्या भूकंपात ९५ जण मृत्यू, तर १३० जण जखमी

नेपाळ-तिबेट सीमा भागात आज सकाळी झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या ९५  वर पोहोचली आहे, तर १३० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेट मधल्या  झिझांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.    बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या...

January 7, 2025 6:50 PM January 7, 2025 6:50 PM

views 10

भारत आणि मलेशिया देशांमधल्या सुरक्षा सहकार्य बळकट करण्यासाठी संमती

भारत आणि मलेशिया ने दहशतवादाचा आणि मूलतत्त्ववादाचा सामना  करण्यासाठी तसंच सायबर सुरक्षा, संरक्षणविषयक उद्योगांच्या आणि सागरी सुरक्षेच्या विषयात सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी संमती दर्शवली आहे. नवी दिल्लीत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मलेशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासंचाल...

January 7, 2025 11:18 AM January 7, 2025 11:18 AM

views 8

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांतील भारत-अमेरिकेदरम्यानच्या जागतिक धोरणात्मक भागीदारीतील महत्त्वपूर्ण प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. विशेषत: तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक, स्वच्छ ऊर्जा, सेम...

January 7, 2025 11:06 AM January 7, 2025 11:06 AM

views 4

कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा दिला राजीनामा

कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी ओटावा इथं एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही अनेक महिने संसद ठप्प राहिल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. जोपर्यंत नव्या नेत्याची निवड होत नाही त...

January 6, 2025 8:14 PM January 6, 2025 8:14 PM

views 2

उत्तर कोरियाचा पूर्वेकडच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा

उत्तर कोरियाने पूर्वेकडच्या समुद्रात मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे अकराशे किलोमीटर्स चा प्रवास करून जपानच्या अलीकडच्या समुद्रात कोसळल असून या माऱ्यामुळे या क्षेत्रातल्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याच दक्षिण कोरियाने म्हटलं  आहे. अमेरिक...