आंतरराष्ट्रीय

February 4, 2025 2:14 PM February 4, 2025 2:14 PM

views 23

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारताचं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारतानं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान दिलं आहे. नियमित पणे योगदान देणाऱ्या ३५ देशांमध्ये भारताची गणना होते.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी कालच्या वार्ताहर परिषदेत भारताच्या नियमितपणाची प्रशंसा केली आहे.  

February 4, 2025 2:10 PM February 4, 2025 2:10 PM

views 14

अमेरिका आपले स्थलांतराचे कायदे आणखी कठोर करत असल्याचं अमेरिकेच्या दूतावासाकडून स्पष्ट

अमेरिका आपले स्थलांतराचे कायदे आणखी कठोर करत असल्याचं अमेरिकेच्या दूतावासानं म्हटलं आहे. अमेरिकेची लष्करी विमानं अवैध स्थलांतरितांना भारतात घेऊन जात असल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी दूतावासानं हे स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ...

February 4, 2025 11:07 AM February 4, 2025 11:07 AM

views 7

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज महाकुंभला भेट देणार

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज प्रयागराज इथं महाकुंभला भेट देणार असून ते त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतील. प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळयात काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दोन कोटी 33 लाख भाविकांनी अमृत स्नान केलं. राज्य सरकारनं भाविकांच्या सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. अ...

February 4, 2025 11:02 AM February 4, 2025 11:02 AM

views 12

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबाने होईल लागू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबानं लागू होईल असं जाहीर केलं आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्याशी द्विपक्षीय स्तरावर मैत्रीपूर्ण चर्चा झाल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा ट्रंप यांनी केला. फेंटानिल औषधाची अवैधरित्य...

February 4, 2025 10:58 AM February 4, 2025 10:58 AM

views 8

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांची एकतर्फी युद्धबंदीची घोषणा

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात कांगो लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 900 लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. बंडखोरांनी गोमा हे प्रमुख शहर ताब्यात घेतले होते तर बुकावू ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृ...

February 4, 2025 10:54 AM February 4, 2025 10:54 AM

views 7

सीरियामध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात, किमान 20 जण ठार

सीरियामध्ये झालेल्या कारबॉम्ब स्फोटात, किमान 20 जण ठार झाले असून त्यात महिलांचा समावेश असल्याचं वृत्त सीरिया सिव्हिल डिफेन्सने दिले आहे. मनबीजच्या मुख्य रस्त्यावर हा स्फोट झाला. सीरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. अद्याप कोणत्याही गटाने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेल...

February 3, 2025 2:26 PM February 3, 2025 2:26 PM

views 11

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा कॅनडा आणि मेक्सिकोचा निर्णय

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा निर्णय कॅनडा आणि मेक्सिको यांनी घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा , मेक्सिको आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे , त्याला प्रत्युत्तर म्हणून या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेमधून ...

February 3, 2025 2:49 PM February 3, 2025 2:49 PM

views 10

भारतीय – अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिला त्रिवेणी या आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार

भारतीय - अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिनं आपल्या त्रिवेणी आल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. लॉस अँजेलिस मध्ये आज झालेल्या ६७ व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अकरा नामांकनं मिळवणारी बियॉन्स हिचा काउ बॉय कार्टर हा आल्बम सर्वोत्कृष्ट ठरला. ग्रॅमी मध्ये सर्वात जास्त नामांकनं मिळवणारी कलाकार ...

February 3, 2025 2:20 PM February 3, 2025 2:20 PM

views 15

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी राजभवनात राज्यपालांची घेतली भेट

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड हे सध्या मुंबई भेटीवर असून त्यांनी काल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि ब्रिटनमधले संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच दोन्ही देशांमधे सहकार्याची भावना वाढीला ल...

February 3, 2025 10:55 AM February 3, 2025 10:55 AM

views 6

इराणने तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे केले अनावरण

अंतराळ तंत्रज्ञान दिनानिमित्त, इराणच्या राजधानीत काल तीन स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचे अनावरण इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि इतर संबंधितांच्या उपस्थितीत कऱण्यात आलं. नवाक 1, पार्स 2 आणि पार्स 1 चे अद्ययावत मॉडेल अशी त्यांची नावं आहेत. इराण अंतराळ संशोधन केंद्रानं विकसित केलेला नवाक संप्रेषण उ...