आंतरराष्ट्रीय

February 9, 2025 8:01 PM February 9, 2025 8:01 PM

views 11

गाझाप्रश्नी इस्लामिक सहकार्य संघटनेनं तातडीच्या बैठकीची इराणची मागणी 

गाझाप्रश्नी इस्लामिक सहकार्य संघटनेनं तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी  इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अर्गाची यांनी केली आहे. इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देलत्ती यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरुनन याबाबत चर्चा केली आणि पॅलेस्टीनींच्या हक्काबद्दल या दोन्ही देशांचं एकमत असल्याची खात्री केली.    ...

February 9, 2025 8:01 PM February 9, 2025 8:01 PM

views 16

युध्दविरामासाठी गाझाच्या मुख्य भागातून इस्त्रायली फोजांची माघार सुरु

हमास आणि इस्रायलमधल्या युध्दविरामाचा भाग म्हणून गाझाच्या  मुख्य भागातून इस्त्रायली फौजेच्या तुकड्या आजपासून परतायला लागल्या आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना या युध्दविरामाच्या करारानुसार आपण पावलं उचलत असलो तरी या कराराची पुढची वाटचाल ही दोन्ही बाजूंवर अवलंबून  असल्याचं नमूद केलं. युद्धव...

February 9, 2025 10:36 AM February 9, 2025 10:36 AM

views 3

खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम मालिकेतील पहिल्या स्पर्धेसाठी डी गुकेश पात्र

या वर्षीच्या खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम मालिकेतील पाचपैकी पहिल्या स्पर्धेत, विश्वविजेता ठरलेला, भारताचा डी गुकेश, फेरीसाठी पात्र ठरला आहे.   जर्मनीतील वेसेनहॉस इथं झालेल्या पात्रता फेरीच्या नवव्या आणि अंतिम फेरीत जगातील सर्वोच्च मानांकित खेळाडू, नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुके...

February 9, 2025 10:31 AM February 9, 2025 10:31 AM

views 14

दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या बस अपघातात 41जणांचा मृत्यू

दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात सुमारे 41 लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे. अपघात झाला तेव्हा ही बस कॅनकून आणि टाबास्को दरम्यान प्रवास करत होती. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

February 8, 2025 3:43 PM February 8, 2025 3:43 PM

views 22

प्रधानमंत्री येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत. पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह-अध्यक्ष पद ते भूषवतील. या शिखर परिषदेत कृत्...

February 8, 2025 2:56 PM February 8, 2025 2:56 PM

views 8

US: जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

अमेरिकेत व्हिसा वर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सिऍटल इथल्या फेडरल न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कार्यकारी आदेशाला न्यायालयानं अ...

February 7, 2025 8:20 PM February 7, 2025 8:20 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १० तारखेपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पॅरिसमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासमवेत सहभागी होणार आहेत. विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी आज ही माहिती दिली. त्याचबरोबर प्रधानम...

February 7, 2025 8:19 PM February 7, 2025 8:19 PM

views 10

गाझा पट्टीतल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलची तयारी सुरु

गाझा पट्टी ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर विधानं केल्यानंतर गाझातल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलनं तयारी सुरु केली आहे. एकदा गाझातून बाहेर पडल्यानंतर इस्राएल पुन्हा परत येऊ देणार नाही अशी भीती वाटत असल्यामुळे पॅलेस्टिनींनी मात्र ट्रंप यांचा प्रस्ता...

February 7, 2025 2:07 PM February 7, 2025 2:07 PM

views 5

इस्राएलने लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी केले हवाई हल्ले

इस्राएलनं काल रात्री लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. इस्राएलच्या लढाऊ विमानांनी पूर्व लेबनॉनच्या बाल्बेक जिल्ह्यातल्या पर्वत रांगांमध्ये, तसंच दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचं लेबनॉनच्या वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. हवाई हल्ल्यांपूर्वी, इस्रायली विमानांनी रश...

February 7, 2025 1:39 PM February 7, 2025 1:39 PM

views 15

पाकिस्तानातल्या ६८ हिंदू भाविकांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नाान

कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या ६८ हिंदू भाविकांचा जत्था काल प्रयागराज इथं पोहोचला आणि त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर या भाविकांनी आपल्या पुर्वजांसाठी धार्मिक विधी आणि प्रार्थना केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना यात्रेकरूंनी कुंभमेळ्...